Accident News Esakal
सातारा

Accident News: पोलिसांच्या भरधाव गाडीने ४ जणांना उडवलं; भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू, ३ जण गंभीर जखमी

सातारा जिल्ह्यातील कराड-ढेबेवाडी मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

सातारा जिल्ह्यातील कराड-ढेबेवाडी मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ४ जणांना धडक दिली. या घटनेमध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. सुजल कांबळे असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. दरम्यान गाडी चालवणाऱ्या पोलिस चालकाने मद्यपान केल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कराड – ढेबेवाडी मार्गावर रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ४ तरुण रस्त्याच्या कडेला उभे राहून गप्पा मारत होते. त्याचवेळी कोळेवाडीकडून ढेबेवाडीकडे निघालेल्या भरधाव पोलीस गाडीने या तरुणांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

मृत तरूण हा कोळेवाडीचा तर जखमी तरूण कुसूरमधील असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT