Police esakal
सातारा

नाईकबाच्या डोंगराला पोलिसांचा वेढा; ढेबेवाडीत आठ ठिकाणी नाकाबंदी

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाच्या आदेशानुसार नाईकबा देवाची यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे.

राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बनपुरी येथील श्री क्षेत्र नाईकबा देवाची आजपासून सुरू होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केल्याने लाखोंच्या गर्दीत चांगभलंच्या गजराने दणाणून निघणारा डोंगरमाथा जणू निःशब्द झाल्याचाच भास होत आहे. मंदिराकडे भाविक येऊ नयेत, यासाठी पोलिसांनी कऱ्हाड ते नाईकबा या 30 किलोमीटरच्या अंतरात आठ ठिकाणी नाकाबंदी करत डोंगर परिसरालाही वेढा दिला आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाच्या आदेशानुसार श्री नाईकबा देवाची यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दोनच दिवसांपूर्वी येथे बैठक घेऊन परिस्थिती व उपाययोजनांचा आढावा घेतला. पाटणचे पोलिस उपअधीक्षक अशोकराव थोरात व सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यात्रास्थळी बंदोबस्तासह अन्य बाबींचे नेटके नियोजन केल्याचे दिसून येत आहे. कऱ्हाड जवळच्या ढेबेवाडी फाट्यापासून नाईकबा मंदिरापर्यंत आठ ठिकाणी नाकाबंदी असून, रात्रंदिवस पोलिसांचा तेथे जागता पहारा आहे.

घाट व पायरीमार्ग बॅरिकेट्‌स लावून अडविला आहे. डोंगर भागातून नाईकबा मंदिराकडे जाणाऱ्या पायवाटांवरही पोलिसांचा वॉच आहे. प्रमुख रस्त्यांवरून पोलिसांची गस्त सुरू असून, येणाऱ्या भाविकांना नाकाबंदीच्या पॉइंटवर अडवून माघारी पाठविण्यात येत आहे. उद्या (रविवारी) पहाटे होणारा पालखी सोहळा रद्द केला असून, काही मोजक्‍या मंडळींच्या उपस्थितीत धार्मिक विधी व मंदिर प्रदक्षिणा होईल. त्यासाठी संबंधितांना ओळखपत्राबरोबरच कोरोना प्रतिबंधक लसीकरण आणि अँटीजन चाचणी सक्तीची केली आहे.

मंदिरात फुलांची आकर्षक सजावट

श्री नाईकबा देवाची यात्रा रद्द केली असली, तरी मंदिराच्या गाभाऱ्यात आणि सभामंडपात झेंडू व अन्य फुलांची सुंदर आरास करण्यात आलेली आहे. "चांगभलं' लिहिलेली सुंदर रांगोळी, फुलांचे रंगीबेरंगी गालीचे, तोरणे, माळा यामुळे संपूर्ण परिसर अधिकच खुलून गेला आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून परिसरातील रस्त्यावर रणरणत्या उन्हात बंदोबस्तासाठी तैनात पोलिस कर्मचाऱ्यांना येथील सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब सावंत आईस्क्रीम पुरवून सामाजिक बांधिलकी जोपासताना दिसत आहेत.

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT