Ajit Pawar esakal
सातारा

'निवडणुकीत घड्याळाच्या चिन्हावर जे उभे राहतील, त्यांनाच निवडून द्या'

रूपेश कदम

तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीसोबत असून तो राजकीय व सामाजिक परिवर्तन करण्यासाठी उत्सुक आहे.

दहिवडी (सातारा) : प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) हेच माण-खटावसाठी योग्य नेतृत्व आहे. त्यामुळे फक्त टाळ्या वाजवू नका, तर येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत (Panchayat Committee Election) त्यांच्या नेतृत्वाखाली ‘घड्याळा’च्या चिन्हावर जे उभे राहतील, त्यांना निवडून देण्याचं काम करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. दिवड (ता. माण) येथे ग्रामीण विकास व सहकार या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil), खासदार श्रीनिवास पाटील (MP Shrinivas Patil), आमदार मकरंद पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, उपसभापती नितीन राजगे, युवा नेते मनोज पोळ, सुरेंद्र गुदगे, तेजस शिंदे, प्रा. कविता म्हेत्रे, युवराज सूर्यवंशी, अभयसिंह जगताप, तानाजी कट्टे, रमेश पाटोळे आदी उपस्थित होते. श्री. पवार म्हणाले, ‘‘शरद पवारांच्या विचारांचे प्रभाकर देशमुख यांचे चांगले नेतृत्व स्वीकारा. जो ऐकणार नाही, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा. तुम्ही राष्ट्रवादीचा आमदार केला असता तर अनेक प्रश्न सुटले असते. इकडून तिकडे उड्या मारू नका. सरपंचांनी फक्त कडक राहू नये, मिळणारा निधी चांगल्या कामासाठी खर्च करावा.’’

प्रभाकर देशमुख म्हणाले, ‘‘मागील निवडणुकीत शरीराने बरोबर; पण मनाने दुसरीकडेच, अशा काही लोकांमुळे अपयश आले. पण, खचून न जाता शरद पवार व अजितदादांच्या नेतृत्वाखाली विकासाची दृष्टी ठेवून काम करत आहे. माण-खटावला प्रगतीच्या पथावर नेण्यासाठी सर्वांची भक्कम साथ आवश्यक आहे. तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीसोबत असून तो राजकीय व सामाजिक परिवर्तन करण्यासाठी उत्सुक आहे. यावेळी बाळासाहेब पाटील, श्रीनिवास पाटील, पोपटराव पवार, शहाजी क्षीरसागर आदींनी मनोगते व्यक्त केली. या वेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यासोबतच नवीन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT