Ajit Pawar
Ajit Pawar esakal
सातारा

मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर आम्ही ठाम; लवकरच निर्णय : अजित पवार

प्रवीण जाधव

सातारा : खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje) यांनी सरकारला 6 जुनपर्यंतची वेळ दिली आहे. यावर अजित पवार म्हणाले, मला त्याची माहित नाही. मुख्यमंत्री व शरद पवार साहेब यांना ते भेटले आहेत. माझी त्यांची ओझरती भेट झाली. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. सरकारची लाईन ऑफ अॅक्शन (Line Of Action) काय असावी ते त्यांच्या अहवालानंतर ठरवले जाईल. मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्याबाबत भूमिका आम्ही सोडलेली नाही. ते कसे बसवायचे याचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी व्यक्त केले. (Political News Deputy Chief Minister Ajit Pawar Spoke On Maratha Reservation In Satara)

मराठा आरक्षण देण्याबाबत आम्ही भूमिका सोडलेली नाही. ते कसे बसवायचे याचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा (Coronavirus) आढावा घेतल्यानंतर मंत्री पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, 8 जिल्हे सर्वाधिक पॉझिटिव्ह आहेत. त्यात सातारा आघाडीवर आहे. त्यानुसार साताऱ्याला आलो आहे. वाढती संख्या रोखण्यावर काय उपाय करायचे यावर चर्चा झाली आहे. जिल्हा परिषदेला 35 रुग्णवाहिकांचा प्रस्ताव देणार आहे. फलटण व माण परिसरात कोरोना उपचारासाठी जंबो हॉस्पिटल (Jumbo Hospital) होण्यासाठी सूचना केली आहे. त्यासाठी पाच दिवसात इ-टेंडर नोटीस देण्याचे निर्देश दिले आहेत.

शंभूराज चिडले

जिल्ह्यात आमदारांनी कोणते काम केले, असे निलेश लंके (Nilesh Lanke) यांचे उदाहरण देऊन विचारलेल्या प्रश्‍नावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई संतप्त झाले. सातारा जिल्ह्यात कोरोना वाढला असे विचारले, त्यावर आम्ही सर्व काम करतो असे सांगून देसाई थोडे जास्त मोठ्याने बोलले. त्यामुळे पत्रकार व शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यात वाद झाला, पण देसाई यांनी अजित पवार यांची माफी मागून मी जास्त बोललो आहे, असे सांगत आम्हीही काम करतो मतदारसंघात जाऊन बघा असे सांगत शांत झाले. त्यावर मकरंद पाटील यांनी वाई तालुक्‍यात काय काम केले हे सांगितले.

अजितदादा म्हणाले...

  • आमदारांनी केलेल्या सूचनांची पूर्तता करणार

  • आरोग्य यंत्रणा चांगले काम करत आहे, जनतेची साथ हवी

  • गृहविलगीकरण तातडीने बंद करा

  • ग्रामीण भागात टाईट करा मग शहराकडे लक्ष दिले जाईल

  • उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे कृष्णाची निवडणूक पुढे ढकलता येत नाही

  • मराठा समाजाला आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध

  • संभाजीराजेंच्या अल्टीमेटमबाबत सोमवारी माहिती घेण्यात येईल

  • कोयना धरणग्रस्तांचे प्रश्‍न कोरोनामुळे रखडले

राजेश टोपे म्हणाले...

  • प्रशासन चांगले काम करते आहे.

  • मात्र कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग वाढवण्याची गरज

  • आठ-पंधरा दिवसात स्थिती नियंत्रणात येईल.

Political News Deputy Chief Minister Ajit Pawar Spoke On Maratha Reservation In Satara

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT