Udayanraje Bhosale esakal
सातारा

अजित पवारांनी आमच्या आज्ञेचं पालन करावं : उदयनराजे

उमेश बांबरे

अजित पवारांचे दौरे होतात ही चांगली गोष्‍ट आहे. वास्तविक, हा विषय त्यांच्याशी निगडीत नाही. पण..

सातारा : जिल्ह्यात अजित पवारांनी जास्तीत-जास्त दौरे करावेत आणि माझ्या विचारांना जास्तीत-जास्त चालना देण्याचे काम 'मंत्री' या नात्याने त्यांनी करावे. आम्ही वेळोवळी सूचना देऊ, त्या त्यांनी आचरणात आणाव्यात, असा खोचक सल्ला खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना साताऱ्यातील दौऱ्यावरून दिला आहे.

साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी, सातारा जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दौरे अलिकडच्या काळात वाढले आहेत. याविषयी विचारले असता, खासदार उदयनराजे म्हणाले, अजित पवारांचे दौरे होतात ही चांगली गोष्‍ट आहे. वास्तविक, हा विषय त्यांच्याशी निगडीत नाही. पण, ते माझ्या मताशी सहमत आहेत. ते सातारा जिल्ह्याचा नक्की विकास साधतील.

ते पुढे म्हणाले, पवारांनी जास्तीत-जास्त दौरे सातारा जिल्ह्यात करावेत. माझ्या विचारांना जास्तीत-जास्त चालना देण्याचे काम मंत्री या नात्याने करण्याचे त्यांचे कर्तव्य आहे. आम्ही वेळोवेळी त्यांना सूचना देत जाऊ, त्या सूचना आचरणात आणण्याचे काम तुमच्यासारख्या तज्ञ आणि अनुभवी लोकांनी केले पाहिजे. ते करतीलही. सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी ते झटत आहेत, ही चांगली बाब आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

LPG दरात मोठी उलथापालथ; कोणाला मिळाला दिलासा, कोणाला नाही? घरगुती अन् व्यावसायिक सिलिंडरमध्ये मोठा फरक

Balbharati : बालभारतीकडून गणितातील चुका मान्य; ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल; दुरुस्तीची ग्वाही

SCROLL FOR NEXT