Corona vaccination campaign esakal
सातारा

कोरोना लसीकरणाची शिबिरं पुढाऱ्यांकडून 'हायजॅक'

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

नगरसेवकांत लसीकरणाच्या माध्यमातून घरोघरी पोचण्याची स्पर्धा लागलीय.

कऱ्हाड (सातारा) : कोरोना लसीकरण (Corona vaccination campaign) वाढविण्याचा पालिकेने (Karad Municipality) निर्णय घेवून वॉर्डनिहाय लसीकरणाची शिबिरं आयोजित केली आहेत. ती शिबिरच तेथील स्थानिक नगरसेवकांनी हायजॅक केली आहेत. लसीकरणाच्या माध्यमातून सामान्यापर्यंत पोचून राजकीय अजेंडा राबवला जातोय. त्याची पालिकेच्या वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे नगरसेवकांत लसीकरणाच्या माध्यमातून घरोघरी पोचण्याची स्पर्धा लागलीय. पालिकेच्या शाळा, मिळेल त्या इमारतीत शिबिरं घेतली जात आहे. त्या शिबिराची माहिती देणारी रिक्षाच प्रत्येक प्रभागात त्या नगरसवेकांच्या नावासह फिरवली जात आहे. त्यामुळे लसीकरण कमी अन् राजकीय स्टंटच जास्त दिसतोय.

शहरातील राजकीय हालचालींना वेग आलाय. कोरोना शिथिल होत असतानाच लसीकरणाचा जोर वाढला आहे. पालिका व नागरी आरोग्य केंद्रातर्फे लसीकरण वाढविण्यात येत आहे. त्यासाठी वॉर्डनिहाय लसीकरण सुरू आहे. त्याला गती आलीय. त्यात स्थानिक लोकप्रतिनिधींसह सामाजिक कार्यकर्ते, संस्था, सेवाभावी संघटनांनी मदत करणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने आवाहनही करण्यात आलेय. काही बँकांनीही त्यात पुढाकार घेतलाय. मात्र, त्यात स्थानिक नगरसेवकांनीही पुढाकार घेतलाय. त्यांनी जवळपास ती शिबिरंच हायजॅक केली आहेत. त्यामुळे पालिकेचा लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य होत असले, तरी नगरसवेकांचा राजकीय अजेंडाही या माध्यामातून सामान्यपर्यंत पोचविला जातोय. शिबिराचे आयोजन केल्याची रिक्षाच प्रत्येक वॉर्डात फिरते आहे. त्या वॉर्डात शिबिराची माहिती देवून खाली स्थानिक नगरसवेकांचे नावही जाहीर केले जात आहे.

त्याशिवाय प्रत्येक लसीकरण केंद्रावर स्थानिक नगरसवेकांतर्फे विविध सुविधा दिल्या जात आहेत. त्यात चहा, बिस्कीटासहीत काही ठिकाणी नाश्त्याची सोय केली जात आहे. त्याशिवाय स्थानिक आरोग्य विभागाच्याही मदतीला नगरसवेक व त्यांचे समर्थक हातभार लावून वेगळी छाप पाडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. नगरसेवकांना पालिकेतून शिबिरीचे शेड्युल्ड दिले जाते, त्यामुळे अन्य कोणाला काही कळायच्या आतच नगरसवेक वॉर्डात त्यांची रिक्षा फिरून श्रेय लाटताना दिसत आहेत. क्वचितच, काही नगरसवेकांनी स्वतः आरोग्य शिबिर घेवून वेगळेपण दाखविण्याचा प्रयत्न करत शहरात स्वतंत्र व्यवस्था केलीय. जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्र यादव यांनीही पोस्ट कोविडचे तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. लोकशाहीचे गटनेते सौरभ पाटील, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी स्वंतत्रपणे आरोग्य शिबिर घेतली आहे, अन्यथा बहुतांशी नगरसवेकांनी पालिकेच्या शिबिरालाच हायजॅक करून आपलाच अजेंडा पुढे रेटला आहे. त्यामुळे यापुढच्या काळातही आता राजकीय स्टंट जोरात होणार आहे, हेच यातून स्पष्ट होते.

लसीकरण पालिकेचे, माहोल नगरसवेकांचा

शहरातील वॉर्डनिहाय होणारे लसीकरण नागरी आरोग्य केंद्र व पालिकेतर्फे होत आहे. मात्र, लसीकरणाचे शिबिर शासनाचे अन् त्या शिबिरात माहोल मात्र नगरसवेकांचा अशीच अवस्था झालीय. त्यामुळे नगरसवेक त्यांचा राजकीय अजेंडा राबविण्यासाठी व सामान्यपर्यंत पोचण्यासाठी त्या शिबिरांचा वापर करत आहे. त्यामुळे त्या शिबिरावर विरोधकातर्फे आक्षेप घेतले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT