Karad Municipality
Karad Municipality esakal
सातारा

कऱ्हाडात राजकीय आरोपांचा भडका; चव्हाण गटाकडून यादव गट 'टार्गेट'

सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : कऱ्हाड पालिकेत राजकीय आरोपांचा भडका उडाल्याने वातावरण तप्त आहे. स्वतःची आघाडी बाजूला ठेवून राजेंद्र यादव यांनी जनशक्ती आघाडीला हायजॅक केल्याचा आरोप कॉंग्रेसच्या युवा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. भाजपनेही तोच आरोप यापूर्वी केला होता. आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी आणलेल्या कामाचे श्रेय ते घेत आहेत. यापुढे ते खपवून घेतले जाणार नाही, असे थेट आव्हान पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे आमदार चव्हाण यांनी पालिकेत नेतृत्वाची धुरा युवकांच्या खांद्यावर दिली आहे, हेही स्पष्ट होते. (Politics Started In Karad Municipality Satara Political News)

आमदार चव्हाण यांनी कऱ्हाडमधील छत्रपती संभाजी भाजी मार्केटसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दोन कोटी रुपये निधी आणला. त्या कामाचे श्रेय लाटण्याच्या यादव यांनी केलेला खोटारडेपणा खपवून घेणार नाही, असा इशाराही आमदार चव्हाण गटाने काल दिला आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीची चाहूल लागलेली दिसते. आमदार चव्हाण गटाने असलेला लोकाश्रय चांगल्या पद्धतीने कॅश करण्यासाठी थेट हल्ला करण्याची अवलंबलेली राजकीय आरोपांची पद्धत वेगळ्याच राजकारणाला जन्म देईल. युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र ऊर्फ आप्पा माने, नगरसवेक इंद्रजित गुजर व अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण यांनी आमदार चव्हाण यांच्या गटातर्फे आरोप केले. त्या निमित्ताने आमदार चव्हाण यांनी पालिकेची राजकीय धुरा युवकांच्या हातात देण्याचा विचार केला आहे, हेही स्पष्ट झाले आहे.

आमदार चव्हाण यांच्यामुळे मंजूर निधीवरून गदारोळ उडाला. त्या गदारोळात आमदार चव्हाण यांच्या गटाची पॉलिसी स्पष्ट झाली असून त्यांनी पालिकेत लक्ष घालण्यासह शहरात स्वतंत्र गट बांधण्यास सुरवात केली आहे. आमदार चव्हाण यांच्या वाढदिवसालाही झळकलेल्या फ्लेक्‍सनेही त्याची झलक दिली होती. आता थेट आरोपामुळे त्याची प्रचितीही येऊ लागली आहे. राजेंद्र यादव यांच्या गटाला थेट टार्गेट केल्याने खळबळ उडाली आहे. भाजपने यादव गटाच्या "जनशक्ती'ला यापूर्वीच थेट आव्हान दिले होते. त्यापाठोपाठ चव्हाण गटाने त्याच गटाला टार्गेट करत "खोटं बोल पण रेटून बोल'ची संस्कृती जपणारा गट असा त्यांच्यावर हल्ला केला आहे. त्याला प्रत्युत्तर काहीही आले, तरी कऱ्हाड पालिकेच्या राजकीय शह-काटशहाला सुरवात झाली आहे, हेच त्यातून स्पष्ट होते.

Politics Started In Karad Municipality Satara Political News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT