सातारा

प्राथमिक आरोग्य केंद्रांवर राहणार सीसीटीव्हीची नजर : उपाध्यक्ष प्रदीप विधाते

प्रशांत घाडगे

सातारा : जिल्ह्यातील 72 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून, त्यासाठी 13 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय आरोग्य केंद्रात दुर्घटना टाळण्यासाठी फायर ऑडिट करण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी दिली.
 
जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची सभा आज प्रदीप विधाते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उषादेवी गावडे, शारदा ननावरे, डॉ. अभय तावरे, डॉ. भारती पोळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील आदी उपस्थित होते. 

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत 72 आरोग्य केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास आरोग्य समितीने परवानगी दिल्याने आता सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली राहणार आहेत. भंडारा येथे शासकीय रुग्णालयास आग लागल्यानंतर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रांचा प्रस्ताव बनविण्यात आला होता. या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून सुमारे दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, लवकरच या कामाची टेंडर प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती श्री. विधाते यांनी दिली. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असून, आरोग्य विभाग निश्‍चितच चांगले काम करत आहे. सर्व विभागांशी समन्वय ठेऊन कोरोना उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. सध्या लसीकरणाची प्रक्रिया वेगाने होत असून, सोमवारी 60 हजार लस उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले. 

आरोग्य समितीत दवाखाना सुरू 

गेल्या कित्येक वर्षापासून जिल्हा परिषदेत दवाखाना सुरू होता. याठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्राथमिक उपचार मिळत होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून दवाखाना बंद करण्यात आल्याने गैरसोय झाली होती. ही गैरसोय दूर करण्यासाठी आरोग्य समितीत पुन्हा दवाखाना सुरू करण्याचा निर्णय झाल्याचे श्री. विधाते यांनी सांगितले.  

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT