सातारा

सकारात्मक मानसिकता हेच काेराेनाला हरविण्याचे शस्त्र : प्रल्हाद पवार

सचिन शिंदे

क-हाड : सहकारी बॅंकेतील मी निवृत्त अधिकारी आहे. पहिल्यापासून घरात शेतीची परंपराही आहे. वयाच्या 73 व्या वर्षी तब्बल 70 टक्के न्यूमोनियाचे इन्फेक्‍शन झालेल्या कोरोनाने मला ग्रासले. जादा वय असलेल्यांना धोका आहे, असे म्हणतात. मात्र, तुम्ही किती सकारात्क आहे, त्यावर सारे काही अवलंबून आहे असे काेराेनाला हरवून घरी परतलेल्या प्रल्हाद पवार यांनी नमूद केले.

पवार म्हणाले, चव लागत नव्हती, वास येत नव्हता. त्यानंतर दोन दिवसांनी पहिल्यांदा ताप आला. औषधे घेतली, बरं वाटले. मात्र, त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा ताप आला. त्यावेळी पोट बिघडले. डॉक्‍टरांना कोरोनाची तपासणी करायला सांगितली. रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. घरचे घाबरले. मात्र, लक्षणे नेहमीची आहेत, काही होत नाही, असा धीर देत मी रुग्णालयात दाखल झालो. पहिल्या दिवशी घाबरलो. मात्र, पुन्हा न घाबरताच कोरोनाशी दोन हात करण्याचा निर्धार केला.

सातारा मिलिटरी कॅन्टीनबाबत महत्वाची बातमी 

इन्फेक्‍शन जास्त होते, "सह्याद्री'त उपचार सुरू असताना आयसीयूमध्ये शिफ्ट केले. तरीही मन डगमगू दिले नाही. दिवसातून तीन वेळा गरम वाफारा, नियमित औषधे, सकस आहारामुळे 26 जुलै ते आठ ऑगस्ट या काळात सह्याद्री रुग्णालायत कोरोनाशी जबरदस्त फाइट दिली. त्यावेळी ताप येणे, पोट बिघडणे, चव न लागणे, वास न येणे अशीच लक्षणे होतीच, त्याशिवाय निमोनियाचे इन्फेक्‍शन 70 टक्‍क्‍यापर्यंत होते.

मराठाबरोबर धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटणार?; माळशिरसमध्ये महत्वपूर्ण बैठक

मानसिकता स्ट्रॉंग ठेवली. दररोजचा सकस आहार, सकारात्मक मानसिकता आणि कोरोनावर मात करायचीच, याच निर्धाराने कोरोनाला हरवून आठ ऑगस्टला घरी परतलो. घरीही विलगीकरणात दहा दिवस काढले. त्यावेळी सकस आहार घेतला. ड्रॉय फ्रूट, ज्यूस, फळे, अंडी, कडधान्य आदींच्या आहाराचे नियोजन केले. घरातल्या घरात व्यायाम केला. कोरोना होण्यापूर्वी दररोज दोन किलोमीटरचे चालणे कायम होते. त्याचा फायदा कोरोनाशी दोन हात करताना झाला.

साता-यातच नव्हे साेलापूर जिल्ह्यातील दाेघींनी पुण्यातही अनेकांना फसविले  


...अशी घेतली काळजी
 
शाकाहारी, मांसाहाराचा सकस आहार
 
फळे, ड्रॉय फ्रूट व ज्यूसचाही समावेश
 
दिवसातून चार वेळा गरम वाफारा
 
नियमित मास्कचा वापर
 
दुसऱ्याशी बोलताना मास्क न काढता बोललो
 
सॅनिटायझरचा नियमित वापर.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT