सातारा

'रयत'चा उपक्रम फलदायी; लाडावलेल्या मुलांच्या वागण्या-बोलण्यात झाला बदल!

दिलीपकुमार चिंचकर

सातारा ः शाळा नाही... छडीचा धाक नाही, अभ्यासाची सक्ती नाही. सर किंवा गुरुजींसारखा मुलांना धाक राहिला नाही. त्यामुळे मुले घरी चांगल्या सवयी विसरू लागली आहेत. पालकांची डोकेदुखी वाढली आहे. यावर रयत शिक्षण संस्थेच्या रा. ब. काळे विद्यालयाने बऱ्यापैकी उपाय काढला असून, ऑनलाइन मूल्यशिक्षण सुरू केले आहे. त्यामध्ये चांगल्या सवयीतून सुटल्याने काहीशी बिघडलेल्या मुलांची गाडी रुळावर येऊ लागली आहे. लाडावलेल्या मुलांच्या वागण्या- बोलण्यात कमालीचा बदल जाणवत आहे. पालकांनी सुटकेचा सुस्कारा टाकला आहे.

कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून 21 मार्चपासून शाळा बंद आहेत. परीक्षा झाल्याच नाहीत. अन्‌ पुढील वर्षाचे शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला मुलांच्या शाळा बंदच आहेत. मुले शाळेत जाऊन अभ्यास करणे आणि घरात राहून अभ्यास करण्यात जमीन अस्मानाचा फरक असल्याचे समस्त पालकांना जाणवत आहे. अनेक विद्यार्थी घरी तेवढ्या काळजीने अभ्यास करत नाहीत. ऑनलाइन तास असेल तेवढा वेळ मुले मोबाईल घेऊन बसतात. ते ही किती मन लावून ऐकतात, हा संशोधनाचा विषय आहे. ऑनलाइन दिलेले पाठ करून घेण्यासाठी पालकांना त्यांच्या मागे लागावे लागत असल्याची दृष्ये पाहावयास मिळतात.

समर्थांच्या किष्किंधाकांडाचे मुद्रणास साताऱ्यात प्रारंभ 

शाळा असली की लवकर उठणे, वेळेवर दात घासणे, स्वच्छता, वेळेवर अभ्यास, इतर संस्कार पाठ होतात, हे घरी होत नाही. मुलांची शाळा सुरू असतानाचा दिनक्रम सध्या उरलेला नाही. मुले निवांत उटतात. बरेच लक्ष खेळण्या-बागडण्यावरच असते. पालकांचे सांगणे धाब्यावर बसवून अनेक मुले आपल्या मनाप्रमाणे दिनचर्येत बदल करत आहेत, केला आहे. यातून पालकांची डोकेदुखी वाढलेली आहे.
 
या बिघडलेल्या मुलांना चांगल्या सवयी लावून रुळावर आणण्यासाठी येथील रा. ब. काळे जीवन शिक्षण विद्यालयाने मुख्याध्यापक अमोल कोळेकर यांच्या संकल्पनेतून शाळेतील पहिली ते सातवीच्या सर्व 300 मुलांसाठी मूल्यशिक्षण पाठ सुरू केला आहे.  स विद्यार्थ्यांचाही मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्रस्त पालकांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. या उपक्रमानुसार दररोज विद्यार्थ्यांना चांगल्या सवयींबाबत मार्गदर्शन केले जाते. समुपदेशन केले जाते. तसेच विविध बाबींतून संस्कार केले जातात. हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी शिक्षिका वर्षा भोसले, ज्योती ढमाळ, आशा वाघमोडे, विजय माने, माधुरी भोईटे, पद्मावती शिंदे परिश्रम घेत आहेत. 

चोरट्याचा साता-यातील 'रिओ' ने घेतला अचूक वेध

शाळेने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे मुलांच्या वर्तनात कमालीचा बदल झाला आहे. मुले सकाळी लवकर उठून स्वतःची कामे स्वतः करू लागली आहेत. मूल्यशिक्षणामुळे गेली सहा-सात महिने लाडावलेल्या मुलांच्या वागण्या-बोलण्यात कमालीचा बदल जाणवत आहे.

प्रिया घोरपडे, पालक 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT