सातारा : रेल्वेला मिळेना ग्रीन सिग्नल!  sakal
सातारा

सातारा : रेल्वेला मिळेना ग्रीन सिग्नल!

कऱ्हाड-कुर्डुवाडी लोहमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण; उद्‌घाटनाची प्रतीक्षा

अमोल जाधव

रेठरे बुद्रुक : रेल्वे मंत्रालयाने पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर आणि कर्नाटक भागाला जोडणाऱ्या लोहमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण केले आहे. कऱ्हाड ते कुर्डुवाडीपर्यंत लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम वर्षभरापासून पूर्ण असून, त्या मार्गावर विजेवरील रेल्वेगाड्या सोडल्या जात नसल्याने प्रवाशांतून नाराजीचा सूर आहे. या मार्गावर विजेवरील रेल्वे सोडण्यास मुहूर्त कधी सापडणार, याची सर्वांना प्रतीक्षा आहे.

कऱ्हाड ते कुर्डुवाडी हा सुमारे १६५ किलोमीटरचा लोहमार्ग दोन टप्प्यात आहे. त्यामधील मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. कऱ्हाड ते मिरज मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम अंशतः पूर्ण झाले आहे. कुर्डुवाडीसह पंढरपूर, मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, भिलवडी व कऱ्हाड ही महत्त्‍वाची स्थानके या मार्गावर आहेत.

दुहेरीकरण झालेल्या शेणोली, भवानीनगर, ताकारी टप्प्यातील मार्ग सध्या दुहेरी वाहतुकीसाठी वापरला जात आहे. मात्र, त्या मार्गावरील विद्युतीकरण वापराविना आहे. सध्या काही मालगाड्या विजेवरील इंजिनासह सोडल्या जात आहेत. विशेषतः मिरज ते कुर्डुवाडी मार्गावर मोठ्या संख्येने विजेवरील मालगाड्या धावत आहेत. प्रवासी गाड्यांना मात्र त्याचा फायदा झालेला नाही. रेल्वे बोर्डाने विद्युतीकरणाची चाचणी घेऊन हिरवा कंदीलही दाखवला आहे. तरीही डिझेलवरील गाड्याच सोडल्या जात आहेत. कोट्यवधी रुपये गुंतवून पूर्ण केलेले विद्युतीकरण वापराविना पडून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT