Heavy Rain esakal
सातारा

पाण्याची चिंता मिटली! साताऱ्यातील अकराही तालुक्यांत पाणीपातळीत वाढ

साहेबराव होळ

पुढील काळातही पडणाऱ्या पावसाचे पाणी अडविल्यास भूजल पातळीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

गोडोली : सातारा जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत पावसाचे (Heavy Rain) प्रमाण वाढल्याने मे २०१६ ते मे २०२० मधील सरासरी भूजल पातळीत वाढ झाली असून, मे २०२१ मध्ये झालेल्या निरीक्षणात सर्व ११ तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात भूजल पातळी वाढलेली आहे. माण व खटाव तालुक्यांमध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचे निर्दशनास येत आहे.

सातारा जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांमध्ये दुष्काळी तालुक्यांत पाऊस समाधानकारक झालाच. पण, शासनस्तरावरून व खासगी संस्थांकडून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या योजनेंतर्गत झालेल्या कामाचा दृश्य परिणाम सध्या सर्वत्र दिसत आहे. मुख्यत्वाने सर्वच तालुक्यांच्या भूजल पातळीमध्ये त्यामुळे वाढ झाली आहे. बागायती क्षेत्रातही वाढ झालेली आहे. शिवाय पावसाळ्यातही काही गावांना टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागायचे, ते चित्र या पावसाळ्यात दिसले नाही. पाण्याचे टॅंकर जवळपास बंद झाले आहेत.

पुढील काळातही पडणाऱ्या पावसाचे पाणी अडविल्यास भूजल पातळीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. चालू हंगामात सगळीकडे पावसाचे प्रमाण सारखे नसले तरी जिल्ह्याच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागात अधिक पाऊस झाला. मात्र, दुष्काळी पट्ट्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. पुढील काळात खरिपासाठी अधिकच्या पावसाची आवश्‍यकता आहे. पुढील काळातही पावसाचा थेंब न थेंब अडवून जमिनीत मुरविला पाहिजे, असे मत वरिष्ठ भूवैज्ञानिक एम. एम. गडकरी यांनी व्यक्त केले.

पाणीपातळीतील वाढ

जिल्ह्यातील तालुकानिहाय पाणीपातळीत झालेली वाढ मीटरमध्‍ये पुढीलप्रमाणे : जावळी ०.४२, कऱ्हाड ०.८०, खंडाळा १.१५, खटाव १.२१, कोरेगाव ०.७२, माण १.२३, महाबळेश्वर ०.९२, पाटण ०.२७, फलटण ०.५१, सातारा ०.३३, वाई ०.६३.

तालुकानिहाय स्थिर भूजल पातळीतही वाढ

सातारा जिल्ह्यात तालुकानिहाय मे २०२१ मध्ये सरासरी स्थिर भूजल पातळी मीटरमध्ये पुढीलप्रमाणे : (कंसात मे २०१६ ते मे २०२० मधील सरासरी भूजल पातळी मीटरमध्ये) जावळी ३.९० (४.३२), कऱ्हाड ४.८७ (५.७८), खंडाळा ५.७६ (६.९१), खटाव ९.१९ (९.४०), कोरेगाव ७.०७ (७.७९), माण ८.४१ (९.६५), महाबळेश्वर १३.८७ (१४.७९), पाटण ४.७८ (५.०५), फलटण ६.९६ (७.४७), सातारा ५.०६ (५.३९), वाई ७.६३ (८.२५).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहची 'डोकेदुखी' वाढवणारी बातमी! निमित्त ठरतोय पाकिस्तानी... नेमकं काय घडलंय?

Jaish-e-Mohammed : पाकिस्तानचा नवा डाव! महिलांसाठी 'जिहादी कोर्स'ची ऑनलाईन सुरुवात; प्रवेश फी फक्त 156 रुपये, कोर्समध्ये काय शिकवले जाणार?

Realme ने आणलाय सुपर Smartphone! बदलू शकता बॅक कॅमेरा, फीचर्स पाहून शॉक व्हाल अन् किंमत फक्त एवढीच...दिवाळीला खरेदी कराच

Diwali 2025: आज पाडवा आणि गोवर्धन पूजा, उद्या भाऊबीज; चुकवू नका महत्त्वाचे मुहूर्त

Crime: सासरेबुआ, तुमच्या मुलीचे तीन प्रियकर, तिला समजावून सांगा! जावयाची विनंती; पण सासऱ्यानं उलट उत्तर दिलं अन्...; नको ते घडलं

SCROLL FOR NEXT