Heavy Rain In Tarale esakal
सातारा

25 वर्षांनंतर तारळेत हाहाकार; सर्व पूल पाण्याखाली

यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (सातारा) : काल दुपारी तीनपासून विभागात पावसाने (Heavy Rain In Tarale) चांगलाच हाहाकार माजविला. केवळ दोन तासात ढगफुटी सदृश झालेल्या प्रचंड पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. तारळे विभागातील सर्व रहदारींच्या मार्गावरील सर्वच पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली. शेतीचेही प्रचंड नुकसान झाले असून घरांचीही पडझड झाली आहे. कोरोनाच्या संकटात या अस्मानी संकटाने बळीराजा अडचणीत सापडला आहे. (Rain Update Today Large Damage To Agriculture And Houses Due To Rain In Tarle Village bam92)

काल दुपारी तीनपासून विभागात पावसाने चांगलाच हाहाकार माजविला. केवळ दोन तासात ढगफुटी सदृश झालेल्या प्रचंड पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.

बुधवारी रात्रीही पावसाने झोडपून काढले होते. काल सकाळी पावसाचा जोर ओसरला होता. मात्र, दुपारी तीननंतर पुन्हा प्रचंड पावसाला सुरुवात झाली. दोन तास झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली मुख्य रहदारीवरील पूल पाण्याखाली गेले होते. तारळे वेखंडवाडी, तारळे जळव पाटण या राज्य मार्गावरील तारळेतीलच आंबा चौक, मार्केट यार्ड जवळ, धनगरवाडीनजीक दोन ठिकाणी, आंबळेजवळ साई इनामदार हॉटेलनजीक, शिवपुरी, ढोरोशी आदी ओढ्यावरुन पाणी वाहिले. तारळे मुरुड मार्गावरील भुडकेवाडी, गोरेवाडी, तोंडोशी, बांबवडे हेही पूल पाण्याखाली राहिले. या पुलांवरून सुमारे तीन चार फूट पाणी अत्यंत वेगाने वाहत होते. मुरुड मालोशी आळी दरम्यानच्या पूलही पाण्यात होते.

घोट गावातील व गावाबाहेरच्या आंबेवाडी, जुगाईवाडी रस्त्यावरच्या पुलांचीही तीच गत झाली होती. कडवे भागही त्यास अपवाद नव्हता. केळेवाडीत बिकट अवस्था केली. पाऊसच इतका झाला की, पाणीच पाणी चोहीकडे अशी गत झाली होती. सर्वात मोठा पूल असलेल्या तारळेतील पुलाला ही सुमारे 25 वर्षांनंतर पाणी टेकले होते. एकूणच कालच्या पावसाने विभागातील सर्व पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काल यामुळे लोकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. घोटमध्ये विठ्ठल सावंत यांच्या घरात ओढ्याच्या पुराचे पाणी घुसले. यात त्यांचे अन्नधान्य व संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. येथे गावकऱ्यांनी मोलाची मदत केली. मालोशी एक घराची पडझड झाली. मुरुडमध्ये संदेश हॉटेलमध्ये पाणी घुसले. 

Tarle Village

सर्व ओढे-नाले पात्र बदलून वाहिल्याने शेतीची धूळधाण झाली आहे. शेतांनाही ओढ्याचे रूप आले होते. विभागातील डोंगरावर झालेल्या पावसाचे प्रचंड पाण्याचे लोट शेतीत घुसले. भात शेतीची खाचरे गाळाने भरून गेली आहेत. जी काही लागण झाली आहे ती भुईसपाट झाली आहेत. याशिवाय भुईमूग व सोयाबीन पीकही पाण्याने धुऊन नेले आहे. उसाला देखील फटका बसला असून विभागातील सर्वच गावातील हजारो एकर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, शिवाय नदीकाठच्या शेतकऱ्यांचे वीज पंप वाहून गेले आहेत. सकाळी देखील पावसाचा जोर सुरच होता. अपवाद वगळता पूल पाण्याखाली होते, जळव घाट वाहतुकीला पूर्ण ठप्प झाला. यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.

Rain Update Today Large Damage To Agriculture And Houses Due To Rain In Tarle Village bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT