Koyna Dam Patan Satara esakal
सातारा

Dam Update : पावसाचा खंड पडल्याने दुष्काळसदृश स्थिती! कोयनेसह 'या' प्रमुख धरणांतील सहा TMC पाणी घटलं; फटका बसण्याची शक्यता

प्रमुख धरणात केवळ ८० टक्क्यांपर्यंतच पाणीसाठा झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांत एकूण ११३.३९ टीएमसी पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ८०.५० टक्के आहे.

सातारा : पावसाच्या (Rain Update) पूर्ण उघडिपीचा परिणाम सध्या जिल्ह्याची टंचाईच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. प्रमुख धरणांत सरासरी ८० टक्केच पाणीसाठा झाला आहे. पावसाअभावी गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यातील सहा प्रमुख धरणांतील सहा टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे.

त्यामुळे आगामी काळात निर्माण होणाऱ्या टंचाई परिस्थितीला तोंड देण्यासाठी धरणातील सध्याच्या उपलब्ध पाण्याचे तातडीने नियोजन करणे आवश्यक आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली आहे. खरिपाची पिके धोक्यात आली आहेत.

तर, यावर्षी प्रमुख धरणात केवळ ८० टक्क्यांपर्यंतच पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा आभाळाकडे आहेत. पुन्हा एकदा मॉन्सून सक्रिय व्हावा, अशी अपेक्षा सर्वांनाच आहे. गेल्या १५ दिवसांत प्रमुख धरणांतील पाणी पातळी घटली आहे. सहा टीएमसीने धरणातील पाणी कमी झाले आहे. त्यामुळे आगामी काळात जोरदार पाऊस झाला नाही, तर किमान धरणातील पाण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहे.

जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांत एकूण ११३.३९ टीएमसी पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ८०.५० टक्के आहे. १५ दिवसांपूर्वी धरणात एकूण ११९ टीएमसी पाणीसाठा होता. गेल्या १५ दिवसांत सहा टीएमसी पाणी कमी झाले आहे. यामध्ये कोयनेतील तीन, धोम दोन, धोम बलकवडी एक, उरमोडी एक, कण्हेर एक टीएमसी पाणी कमी झाले आहे. १५ दिवसांपूर्वीची पाणीपातळी टीएमसीमध्ये अशी होती.

कोयना ८४.८६, धोम ११.५१, धोम बलकवडी ३.८६, कण्हेर ८.१६, उरमोडी ६.१५, तारळी ५.२९. दरम्यान, आगामी दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धरणातील पाणी राखीव ठेवले जाणार आहे. त्यामुळे नदीवरून अवलंबून असलेल्या पाणी योजनांना फटका बसण्याची शक्यता आहे.

धरणातील पाणी पातळी

(धरणाचे नाव, टीएमसीमध्ये पाणीसाठा)

  • कोयना - ८१.१३,

  • धोम - ९.४१,

  • धोम - बलकवडी - ३.९०,

  • कण्हेर - ७.७४,

  • उरमोडी - ५.७५,

  • तारळी - ५.४६.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT