सातारा

स्वच्छ सर्वेक्षणावरुन कऱ्हाडात राजकीय वातावरण तापले!

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : स्वच्छ सर्वेक्षण 2021 शहर तिसऱ्यांदा देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी ज्या उपाययोजना करायच्या आहेत, त्यासाठी पालिकेची विशेष सभा बोलवा, अशी मागणी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्याकडे जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्र यादव यांनी केली आहे. 

काही दिवसांपासून ठराव मंजूर व स्वाक्षऱ्या करण्यावरून नगराध्यक्षा शिंदे व जनशक्ती आघाडीत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. त्यामुळे पालिकेतील राजकीय वातावरण गरम आहे. पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी नगरसेवकांना स्वच्छ सर्वेक्षणांवरून पत्रे दिले. त्यावर ठराव प्राप्त न झाल्याने आपण स्वच्छ सर्वेक्षणातून थेट बाहेर पडावे, असे सूचित केले आहे. त्यांनी ठरावाकडे लक्ष वेधल्याने पालिकेत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जनशक्तीचे गटनेते यादव यांनी विशेष सभेची मागणी केली आहे. त्यामुळे त्याचीही उत्सुकता लागली आहे. 

जनशक्तीचे गटनेते यादव यांनी केलेल्या मागणीत स्वच्छ सर्वेक्षण 2021 च्या अनुषंगाने अनेक कामे करणे गरजेचे आहे. ती कामे मंजूर व्हावीत, यासाठी विशेष सभेची गरज आहे. सभेत महत्त्वाची कामे मंजूर करून ती लवकरात लवकर सुरू केली तरच आपण पहिल्या क्रमांकावर टिकून राहू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर पालिकेची सभा बोलवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Customs Duty: भारतातून आणलेल्या सामानावरील शुल्क सवलत वाढली! नेपाळ सरकारचा मोठा निर्णय; सीमेलगतच्या नागरिकांना मोठा फायदा

Krunal Pandya: हार्दिक आणि कृणालमध्ये खरंच दुरावा आला आहे? अखेर मोठ्या भावानेच सांगितले संपूर्ण सत्य, म्हणाला आमच्यात वाद...

Ghodegaon Crime : जुन्या वादातून आयटीआय वसतिगृहात तरुणाला संपविले; पोलिसांकडून काही तासांतच आरोपीला बेड्या

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गावी गेलेल्या कुटूंबाचा टेम्पोखाली चिरडून मृत्यू

Mumbai News: दिल्लीतील अग्निकांडानंतर मुंबई फायर ब्रिगेड सतर्क, हॉटेलांवर 'अग्निशमन'ची करडी नजर

SCROLL FOR NEXT