School and college Girls esakal
सातारा

Satara : आता शाळकरी, महाविद्यालयीन मुलींना दिले जाणार स्वसंरक्षणाचे धडे; राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय

राज्यात शासनाच्या वतीने शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.

दिलीपकुमार चिंचकर

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील मोठी महाविद्यालये निवडून तेथे मुलींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तेथेच शाळकरी मुलींनाही प्रशिक्षणासाठी बोलविले जाणार आहे.

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात शासनाच्या वतीने शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. या योजनेतून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक हजार यानुसार ११ हजार मुलींना स्वतःचे रक्षण करण्यात सक्षम केले जाईल.

त्याबरोबरच त्यांचे समुपदेशनही केले जाणार आहे. महिला व बालविकास विभागाच्या वतीने ही योजना राबविली जाणार आहे. राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने ही योजना राज्यात राबविली जाणार आहे. सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या साहाय्यानेही हे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे.

अशी माहिती महिला व बाल विकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे यांनी दिली. महिला व मुलींवर होणारे अत्याचार व त्यातून केली जाणारी त्यांची हत्या हे समाजासमोरील आव्हान आहे. त्याला आळा बसण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

त्यासाठीच शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. आयुक्त, महिला व बाल विकास या कार्यालयामार्फत राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या साहाय्याने महाविद्यालयीन युवतींसाठी तालुकास्तरावर विद्यापीठांच्या मदतीने स्वसंरक्षण शिबिरांचे आयोजन करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

स्थानिक महिला बचतगट, अंगणवाडी सेविका, स्थानिक सामाजिक संस्था, महाविद्यालयीन एनएसएस, स्थानिक पोलिस यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी केला जाणार आहे. या उपक्रमात युवतींचे मनोबल उंचविण्यासाठी तीन दिवस समुपदेशन सत्र आयोजित करण्यात येणार आहेत.

प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी महिला व मुलींवरील हिंसाचार-संकल्पना व सद्यःस्थिती या विषयावर समुपदेशकांकडून मार्गदर्शन केले जाईल. सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा या वेळेत होणाऱ्या प्रशिक्षणात एक हजार युवती सहभागी होतील. दुपारी साडेबारा ते दीड या वेळेत तंत्रज्ञान आणि महिला व मुलींना असलेले धोके या विषयावर सायबर सेल तज्ज्ञ अधिकारी मार्गदर्शन करतील.

प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी स्वसंरक्षणाचे प्राथमिक प्रशिक्षण सकाळी नऊ ते पावणेदहा या वेळेत होईल. यामध्ये एक हजार युवतींना २० प्रशिक्षक प्रशिक्षण देतील. त्यानंतर आधुनिक प्रशिक्षण या विषयावर सकाळी दहा ते साडेदहा या वेळेत प्रशिक्षण होणार आहे.

प्रशिक्षणाच्या तिसऱ्या दिवशी प्रात्यक्षिक आणि सराव याबाबत सकाळी नऊ ते पावणेदहा या वेळेत प्रशिक्षण, सकाळी दहा ते साडेदहा या वेळेत प्रात्यक्षिक आणि सराव होईल. तीन दिवसांच्या शिबिरानंतर ज्या युवतींना अधिक स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणात रुची असेल, अशा युवतींची संख्या लक्षात घेऊन त्यादृष्टीने पुढील दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन विभागामार्फत करण्यात येईल. या प्रशिक्षण शिबिराची तयारी युद्धपातळी केली जात असल्याची माहिती ढवळे यांनी दिली.

दोन टप्प्यांत प्रशिक्षण…

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील मोठी महाविद्यालये निवडून तेथे मुलींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तेथेच शाळकरी मुलींनाही प्रशिक्षणासाठी बोलविले जाणार आहे. सध्याच्या पावसाळ्यामुळे हे प्रशिक्षण बंदिस्त हॉलमध्येच घ्यावी लागणार आहेत. त्यामुळे एक हजार मुलींचे प्रशिक्षण दोन टप्प्यांत घेतले जाणार असून, प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची निवडही शासनाने केल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Dombivli Election : आमदारांच्या मुलाचा बिनविरोध विजय; कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाची घोडदौड वेगात!

Sudhakar Badgujar : नाशिक भाजपमध्ये बडगुजर पॅटर्नचा धमाका; पत्नी आणि पुत्रासह स्वतःची उमेदवारी केली निश्चित

Latest Marathi News Live Update : एरंडोल नगरपालिका निवडणुकीत पाच अविवाहित युवकांचा विजय

BEE Star Rating : इलेक्ट्रॉनिक वस्तु खरेदीचे नियम बदलले; लागू झाला BEE स्टार रेटिंगचा आदेश, थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम

Khus Khus Halwa: गाजर किंवा मूगडाळीचा हलवा विसरा! या हिवाळ्यात ट्राय करा पौष्टिक आणि चविष्ट ‘खसखस हलवा’

SCROLL FOR NEXT