सातारा

जयंत पाटलांनी रेनगेज स्टेशन उभी केली पण....

विजय लाड

कोयनानगर (जि.सातारा) : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस मोजण्यासाठी सध्या कार्यरत असणारी सॅटेलाइट यंत्रणा सदोष ठरल्यामुळे पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या नोंदीसाठी पर्यायी यंत्रणा उभी करा, असा आदेश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे. यामुळे कोयना प्रकल्पाने कोयना, नवजा, महाबळेश्वर याठिकाणी रेनगेज स्टेशन उभी केली आहेत; परंतु या स्टेशनमध्ये पाऊस मोजण्यासाठी कर्मचाऱ्याची अद्याप नियुक्ती न केल्यामुळे ही रेनगेज स्टेशन ओस पडली आहेत.

 
रेन गेज स्टेशन उभी करून सुद्धा या तीन पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस मोजण्यासाठी हंगामी अनुभवी पर्जन्यमापकाची नेमणूक करण्यात आली नाही. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मॉन्सून सक्रिय झाला आहे. पाऊस सक्रिय झाल्यापासून पाऊस मोजणारी सॅटेलाइट ही यंत्रणा बंद पडू लागली आहे. पर्यायी यंत्रणा सुरू नसल्याने पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाची माहिती मिळवण्यासाठी कोयना प्रकल्पाला परिश्रम घ्यावे लागत आहे.
 
याबाबत कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""रेनगेज स्टेशनमध्ये पडणारा पाऊस मोजण्यासाठी यंत्रणा बसविली असली, तरी या ठिकाणी पाऊस मोजण्यासाठी वेगळी यंत्रणा नाही. आमच्याकडे असणाऱ्या यंत्रणेमार्फत पाऊस मोजण्याचे काम सुरू आहे.''

एसपी तेजस्वी सातपुतेंच्या टीमपुढे उभे ठाकले यांचे चॅलेंज

प्रशासनाच्या कासव गतीने वाढविली 30 हजार युवकांची चिंता  

पर्जन्यमापकाची 33 पदे रिक्त 

कोयना प्रकल्पात पर्जन्यमापकाची 33 पदे रिक्त आहेत. ही पदे तातडीने भरावी, अशी मागणी कोयना प्रकल्पाने शासनाकडे केली आहे. गेली अनेक वर्ष कोयना प्रकल्पाचे अधिकारी वर्गाने "ठेकेदार धार्जिणे धोरण ठेवल्याने ही पदे भरली गेली नाहीत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना प्रकल्पाच्या अधिकारी वर्गाने हे धोरण बदलून पर्जन्यमापक ही पदे भरून कोयनेचे पूर नियंत्रण उत्कृष्ट करावे, असे आदेश दिले आहेत.

ग्रामस्थांच्या काळजीने महाबळेश्‍वर, पाटण, जावळी तालुक्‍यात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला असा पुढाकार
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archaeological Survey of India: भारतात सापडला २,३०० वर्षे जुना रहस्यमय शिलालेख; एक मॅसेजने इतिहासात खळबळ... आता ASI करणार चौकशी!

Shaktipith project : इको सेन्सिटिव्ह झोनचा प्रभाव; शक्तिपीठ प्रकल्पासाठी कडक निकष, २५ गावांसाठी अधिसूचना

Mumbai Crime: मुंबई जैन मंदिरातील दीड कोटींची चोरी उघड; पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ‘चंबळ’तील अट्टल गुन्हेगार ४८ तासांत जेरबंद!

अजय देवगणसाठी तब्बू झालेली वेडी! एक दोन नाहीतर 'या' ९ अभिनेत्रींसोबत अजयचं सुरू होतं प्रेम प्रकरण, एकीसोबत तर आज सुद्धा नाव

Latest Marathi News Live Update : एलपीजी संकटाने गुजरातमधील स्थलांतरित मजूर बिहारमधील आपल्या गावी परतले

SCROLL FOR NEXT