Release of 10 thousand cusecs of water from Koyna Dam into Krishna River 
सातारा

कोयना धरणातून 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उघडले

जालींदर सत्रे

पाटण - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेले चार दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर कायम असल्याने कोयना धरण व्यवस्थापनाने आज सकाळी दहा वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उघडले. सहा वक्र दरवाज्यातून आठ हजार आणि पायथा वीज गृहातून २१०० असा एकूण १० हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात करण्यात येत आहे. धरणातून पाणी सोडल्याने कोयना नदीच्या पाणीपातळी वाढ होणार असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयना धरण पुर्ण क्षमतेने भरेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र गेल्या चार दिवसांत २० टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. आज धरण व्यवस्थापनाने संभाव्य पूरस्थिती निर्माण होऊ नये व धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी जलाशयाची पाणीपातळी २१५०.२ फुट तर एकुण पाणीसाठा ८८.११ असताना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उघडले. एक जुनरोजी धरणाच्या जलवर्षाची सुरुवात झाली. त्यावेळी धरणाचा पाणीसाठा २१.१८ टीएमसी होता.

पावसाने ओढ दिल्याने व पुर्वेकडे सिंचनासाठी पाणी सोडण्यात आल्याने एक जुलै रोजी पाणीसाठा १३.५५ टीएमसी पर्यंत खाली आला होता. मॉन्सूनचा पाऊस यावर्षी हुलकावणी देईल असे वाटत होते मात्र जुलै महिन्यात मॉन्सूनच्या पावसाचे दमदार आगमन झाले आणि पाणीसाठ्याने अर्धशतक झळकावून शतकाकडे वाटचाल सुरू केली होती. मात्र पुन्हा पावसाने उसंत घेतली आणि काळजी वाटू लागली होती. परंतु पाच दिवसांपासून पुन्हा दमदार पावसाचे आगमन झाले.

सलग चार दिवस धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत होता. बुधवारी पाणीसाठ्याने ८० टीएमसी चार टप्पा पार केला आणि प्रशासनाने गुरुवारी दुपारी तीन वाजता पायथा वीज गृहातून २१०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली. काल सायंकाळी पाच वाजता कोयना धरणाचा एकुण पाणीसाठा ८५.२१ टीएमसी झाला आणि प्रशासन अलर्ट झाले. पावसाचा जोर कायम राहिला तर पाणीसाठा नियंत्रण ठेवणे अवघड होईल. संभाव्य पूरस्थिती व पाणीसाठा नियंत्रण ठेवण्यासाठी आज सहा वक्र दरवाज्यातून पाणी सोडण्यात येईल असे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार यांनी जाहीर केले व आज सकाळी दहा वाजता त्यांची अंमलबजावणी केली.

१ जुन पासून कोयना धरणात एकुण ८२.९१ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. पायथा वीज गृहातून पुर्वेकडे सिंचनासाठी व पाणीसाठा नियंत्रणासाठी २.६३ टीएमसी व पश्चिमेकडे वीज निर्मितीसाठी ७.६३ टीएमसी असा एकूण १०.२७ टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला आहे. धरणात सध्या प्रति सेकंद ४९८६० पाण्याची आवक होत आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे ३२७१ मिलिमीटर, नवजाला ३८७० मिलिमीटर आणि महाबळेश्वरला ४१९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi-Hindi controversy : मराठी शिकत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही; शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे मोठे विधान

ITI Courses: ‘आयटीआय’मध्ये सहा नवे अभ्यासक्रम; कौशल्य, रोजगारमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

सायना नेहवालचा घटस्फोट, इन्स्टा पोस्टमधून केलं जाहीर; १० वर्षे रिलेशनशिपनंतर लग्न, ७ वर्षांचा संसार

Satara News :'परतीच्या प्रवासात माउली फलटणमध्ये'; मुक्‍कामस्‍थळी आरतीसाठी गर्दी, पालखीसोबत दोन हजार वारकरी

Lonavala Accident: ट्रकमधील पाइप पडून दोन महिला ठार; पाच जखमी, बोरघाटात पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील घटना

SCROLL FOR NEXT