Republican Party  esakal
सातारा

मागासवर्गीय निधीचा वापर कोरोनाच्या उपायांसाठी खर्च करा; 'रिपब्लिकन'ची सरकारकडे मागणी

सध्या देशात व राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. या लाटेत जिल्ह्यात दररोज रुग्णसंख्या वाढत आहे.

सकाळ वृत्तसेवा

वाई (सातारा) : ग्रामपंचायतीमध्ये मागासवर्गीयांसाठी राखीव असलेला 15 टक्के निधीचा (Backward Class Fund) वापर कोरोना महामारीच्या (Coronavirus) उपाययोजनांसाठी खर्च करावा. त्यातून प्रत्येक तालुक्‍यात 25 व्हेंटिलेटर बेड्‌स निर्माण करावेत, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केली आहे. (Republican Party Demand That Backward Class Fund Be Used For Coronavirus Measures)

याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकऱ्यांना दिले आहे. सध्या देशात व राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. या लाटेत जिल्ह्यात दररोज रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामध्ये उपचारासाठी बेड उपलब्ध न झाल्याने मागासवर्गीय, दलित, कष्टकरी जनतेला उपचारात अनेक अडचणी येत आहेत. कुठल्याही तालुक्‍यामध्ये कोरोनावर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नाहीत. त्यातील दलित समाजातील लोकांकडे जगण्यासाठी एक वेळचे जेवण मिळत नाही, तर ते उपचारासाठी पैसे कोठून आणणार आणि खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायचे तर शासनाने एका दिवसासाठी आयसीयूतील सेवेसाठी नऊ हजार रुपये दर निश्‍चित केला आहे.

एवढे पैसे सामान्य जनतेच्या जवळ नसल्याने ते उपचार घेऊ शकत नाहीत. त्यासाठी शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीतील 15 टक्के राखीव असलेला मागासवर्गीय निधी एकत्रित करावा व त्यामधून गरिबांसाठी प्रत्येक तालुक्‍यात किमान 25 व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था उभी करावी आणि सामान्य माणसाला कोरोनापासून वाचण्यासाठी प्रयत्न करावा. तसे केल्याने सामान्य व गरिबांना वेळेत उपचार मिळतील. गावाचा विकास हा आज नाही तर उद्या होणारच आहे. माणूस जिवंत राहिला, तरच या विकासकामांचा उपयोग होणार आहे. म्हणून सर्व दलित चळवळीतील संघटना एकत्र येऊन मागासवर्गीय 15 टक्के, तसेच 15 व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर कोरोनाच्या उपाययोजनांसाठी करावा, अशी सूचना आहे. या निवेदनाच्या प्रती वाईच्या प्रांताधिकारी, तहसीलदार व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Republican Party Demand That Backward Class Fund Be Used For Coronavirus Measures

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Rule: घेतलेलं कर्ज परत नाही केलंत? तर तुमचा फोन लॉक होईल, आरबीआयकडून नवा नियम आणण्याची तयारी

लई भारी! दुर्मिळ आजारने त्रस्त असलेल्या बाळाला जॅकलिनची मदत, उचलला शस्त्रक्रियेचा खर्च, व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Updates Live : ज्येष्ठ काँग्रेस नेते, केरळ विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि केपीसीसीचे माजी अध्यक्ष पी. पी. थानकाचन यांचे निधन

Sinnar News : सिन्नर एमआयडीसीत नवीन अग्निशमन बंब दाखल, उद्योगांना मोठा दिलासा

Beed Crime : हुंड्यासाठी अजून एक बळी; गेवराईच्या २२ वर्षीय नवविवाहितेने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT