mp shrinivas patil sakal
सातारा

कऱ्हाड विमानतळ परिसरातील निर्बंध तात्काळ हटवावेत; श्रीनिवास पाटील

विमानतळ परिसरातील निर्बंध तात्काळ हटवून स्थानिक नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज लोकसभेत केली.

- सचिन शिंदे

कऱ्हाड - विमानतळ परिसरातील निर्बंध तात्काळ हटवून स्थानिक नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज लोकसभेत केली. संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू असून तातडीच्या सार्वजनिक मुद्द्याच्या अनुशंगाने खासदार पाटील यांनी आग्रही मागणी केली.

खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, कऱ्हाड शहराच्या बाहेर सुमारे चार किलो मीटरवरील विमानतळ लहान व विनापरवाना आहे. हे विमानतळ हेलिकॉप्टर आणि छोट्या खाजगी विमानांसाठी क्वचित प्रसंगी वापरले जाते. त्यानुसार वर्षभरात सुमारे २० विमाने येतात. मात्र विमानतळामुळे आजूबाजूच्या वीस किलोमीटरच्या परिसरात बांधकाम आणि वृक्षारोपणावर निर्बंध लावले आहेत. त्यासंदर्भात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने सातारा जिल्हाधिकारी यांना निर्बंधाचे निर्देश दिले आहेत. त्या निर्देशानुसार कऱ्हा़डच्या विमानतळापासून वीस किलोमीटरच्या परिघात कोणत्याही प्रकारचे बांधकाम, वृक्षारोपण करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे नागरिकांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे.

कऱ्हा़डचे विमानतळ विना परवाना छोटेसे विमानतळ आहे. त्याचा वापर फार कमी वेळासाठी होत असतो. तसेच या निर्बंधामुळे संपूर्ण परिसराचा विकास ठप्प होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. याबाबींची दखल घेऊन लादलेली निर्बंध उठवावेत किंवा किमान कोणत्या प्रकारची आणि कोणत्या उंचीपेक्षा जास्त बांधकामांना ना हरकत परवानगी आवश्यक आहे यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची गरज आहे. यापूर्वी खासदार पाटील यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया व केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल (नि) व्ही.के.सिंग यांच्याकडे देखील पत्राद्वारे ही मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni ruled out: महेंद्रसिंग धोनी दोन आठवड्यांसाठी IPL 2026 मधून बाहेर; CSK ला पहिल्या सामन्याआधी मोठा धक्का

Illegal Infant Disposal Case : आक्काताई लावत होती मृत अर्भकाची विल्हेवाट, नातेवाईकांनी नकार दिल्यास थेट उघड्यावर अर्भक फेकायचे; पेशंटचीही होणार चौकशी

Latest Marathi News Live Update : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल

Pune News: महापालिकेच्या जागेवर बेकायदा खाऊगल्ली; कर्वेनगरमधील प्रकार; आर्थिक फायद्यासाठी खासगी वापराचा आरोप

IPL 2026 Marathi News: जसप्रीत बुमराह MI vs KKR सामन्यात नाही खेळणार? समोर आले मोठे अपडेट्स, CoE मध्ये झालेला दाखल

SCROLL FOR NEXT