Sameer Malusare climb highest peak mount kilimanjaro Africa shiv jayanti 2023  sakal
सातारा

Shiv Jayanti : आफ्रिकेतील किलीमांजरोवर फडकला भगवा,सर्वोच्च शिखरावर शिवरायांचा जयघोष

कोरेगावच्या गिर्यारोहकाकडून अनंत अडचणींवर मात; समीर मालुसरेने केले सर्वोच्च शिखर सर

सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव : येथील तरुण गिर्यारोहक समीर मालुसरे याने आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो (१९३४१ फूट) सर केले. या मोहिमेत त्याने शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळा शिखरावर नेऊन भारतीय तिरंग्यासह भगवा ध्वज फडकवला.

समीरने १५ फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता पाच सहकाऱ्यांसह मोहिमेला प्रारंभ केला. तीन दिवसांची आगेकूच करत त्याने शिखरावरील चढाई सुरू केली. वातावरणाचा त्रास जाणवू लागल्यानंतर मोहिमेतील पाचपैकी दोघे परत फिरले.

मात्र, अंतिम टप्प्यातील सलग नऊ तास अत्यंत अवघड चढाई १९ फेब्रुवारीच्या मध्यरात्री सुरू करत किलीमांजारो शिखरावर सकाळी पोचून छत्रपती शिवरायांचा जयघोष करत समीरने आपल्या दोन सहकाऱ्यांसह ही मोहीम फत्ते केली.

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे आयोजन केले होते. असंख्य अडथळे आणि अडचणी पार करत त्याने हे यश मिळवले. किलीमांजारो हे टांझानिया (आफ्रिका) देशातील शिखर आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची १९३४२ फूट आहे. अवघड, सतत बदलते वातावरण, उणे १५ ते २० तापमान आणि उंच असलेले हे शिखर सर केल्याबद्दल समीरचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून ३६० एक्सप्लोररमार्फत त्यांनी सात महाद्वीपामधील पहिले शिखर सर केले आहे. पुढे बाकी महाद्वीपामधील उर्वरित सर्वात उंच सहा शिखरे सर करण्याचा त्याचा मानस आहे.

या मोहिमेचा खर्च खूप मोठा होता, त्यासाठी समीरला कोरेगाव शहरात व जिल्ह्यातील अनेक दानशूर व्यक्तींसह छत्रपती संभाजीनगरमधील रहिवासी, मित्रपरिवाराने मोठा सहयोग दिला.

दक्षिण आफ्रिकेत जाऊन यशस्वी केलेल्या या मोहिमेत समीरला महाराष्ट्रातील तुषार सुभेदार, सागर कुंभारे, सुबोध वरघट व सागर बोडके यांची साथ लाभली.

गिर्यारोहणाची आवड कायम जोपसणार आहे. यानंतर जगातील सातही खंडांतील सात सर्वोच्च पर्वतशिखरे सर करण्याचे आपले ध्येय आहे.

- समीर मालुसरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: ठाकरेंच्या शिलेदारांचा महायुतीशी सामना, मुंबईत दुरंगी सामने अटीतटीचे ठरणार; कोण-कुठे लढणार?

Ruturaj Gaikwad: 'ऋतुराजला संधी तेव्हाच मिळेल, जेव्हा विराट आणि रोहित वनडेत...', R Ashwin नेमकं काय म्हणाला?

Election: निवडणूक की सत्तेचा सौदा? मतदारांचा विश्वास तुटतोय, मतदान टक्केवारी कमी होणार? मनपा निवडणुकांपूर्वीच प्रश्नचिन्ह

Angarki Sankashti Chaturthi 2026: अंगारकी चतुर्थीला करा 'हे' उपाय, भगवान गणेशाच्या आशीर्वादाने संपत्तीत होईल वाढ

Attack on US Vice President Residence : मोठी बातमी! अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.व्हान्स यांच्या वॉशिंग्टनमधील घरावर हल्ला

SCROLL FOR NEXT