Sangli's corona-affected Kale ate at home in the village and panic spread in the village Satara Pachim Maharashtra 
सातारा

सांगलीचा कोरोनाबाधित काले गावातील घरात जेवला अन् गावात पसरली धास्ती...

सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड - तालुक्यातील लोकसंख्येचे मोठे गाव म्हणून काले गावची ओळख आहे. गावात कोरोनाची संसर्ग नव्हता मात्र गावातून कोयना वसाहत येथे राहण्यास आलेल्या कुटूबांतील दहा वर्षाचा मुलानंतर आज गावात आणखीनच धास्ती वाढली. मुळचा सांगलीचा एक कोरोनाबाधित व्यक्ती पूर्वीच काही दिवसापूर्वी कालेतील एका घरात जेवण करून गेला आहे. त्या कुटूबांचा गावात काल दिवसभर प्रशासन शोध घेत होते. अखेर रात्री प्रशासनाचा तो शोध संपला ते घरही सापडले. त्या घरातील चौघांना क्वारंटाईन केले आहे. त्यामुळे तीन महिन्यापासून सुरक्षित असलेल्या काले गावाच्या वेशीवर कोरोनाचे संकट घिरट्या मारू लागले आहे.

येथील कुटूंब पॉजिटीव्ह रूग्णाच्या संपर्कात आल्याने त्या कुटूंबाला काल रात्री विलगीकरण कक्षात ठेवले आहे. मुंबईहून आलेला व मुळचा सांगली जिल्ह्यातील एक व्यक्ती काले गावातील एका कुटूंबाच्या घरी जेवून गेला आहे. त्यानंतर त्याचा अहवाल पॉजिटीव्ह आल्याने त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची चौकशी झाली आहे. त्यावेळी तो व्यक्ती काले येथे आला असे चौकशीत पुढे आले आहे. त्याने कालेमध्ये ज्या कुटूंबात जेवण केले. त्यांचा काल सकाळ पासून शोध घेण्यात आला. रात्री त्याबाबत पूर्ण शहानिशा झाल्यावर तपास संपला. तो ज्या घरात जेवण करून गेला होता. ते कुटूंब सापडले. त्या कुटूंबांतील चौघांना जणांना अलगीकरण कक्षात नेण्यात आले.

त्यासाठी रूग्णवाहिका गावच्या मुख्य प्रवेश दारात आली आणि गावात चर्चेला उधान आले. त्या कुटूंबातील पती पत्नी व त्यांची दोन्ही मुलांना विलगीकरण कक्षात नेण्यात आले आहे. दोनच दिवसापुर्वी कोयना वसाहत येथे वास्तव्यास असलेल्या दहा वर्षाच्या मुलाची कोरोना टेस्ट घेण्यात आली आहे. ती चाचणी पॉजिटीव्ह आली व मुळचे काले येथील कुटूंब असल्याने कालेत चांगलीच भीती दाटली आहे. कालचा प्रकार घडला तोच आज रात्री ती गोष्ट समोर आल्याने  लॉकडाऊन मध्ये बिनधास्त असलेल्या गावात धास्ती पसरली आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कातील लोकांचे काय अहवाल येणार याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT