सातारा

पेट्रोलने विहिर भरणा-या पुण्यातील टोळीस अटक

रमेश धायगुडे

लोणंद (जि. सातारा) : हिन्दुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या लोणी ते मिरज जाणाऱ्या उच्च दाबाच्या पेट्रोलच्या पाइपलाइनला सासवडच्या (ता. फलटण) हद्दीत होल पाडून पेट्रोल चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अंतरराज्य टोळीतील 7 जणांना गजाआड केले. त्यात सातारा जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. लोणंद पोलिस व गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कामगिरी केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली.
 
या वेळी लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. या प्रकरणी अनित हरिशंकर पाठक (वय 32, हल्ली रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड- पुणे, मूळ गाव पिंडराई, पाटखन, जि. वाराणशी), बाळू अण्णा चौगुले (वय 42, रा. रामनगर, चिंचवड- पुणे), मोतिराम शंकर पवार (वय 20, रा. गवळी माथा, भोसरी- पुणे), इस्माईल पिरमहंमद शेख (वय 62, रा. पिंपरी- पुणे), श्‍याम शिवाजी कानडी (वय 50, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), दत्तात्रय सोपान लोखंडे (वय 41, रा. सासवड, ता. फलटण) व नामदेव ज्ञानदेव जाधव (वय 28, रा. दालवडी, ता. फलटण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, नगर, बागलकोट (कर्नाटक) आदी जिल्ह्यांतील महिलांचे बचत गट, खातेदारांना 'राॅयल'च्या नावाने त्याने फसविले
 
या वेळी पोलिस अधीक्षक श्री. बन्सल यांनी लोणंद पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले. ते म्हणाले, ""हिन्दुस्थान पेट्रोलियम कंपनीची लोणी ते मिरज ही उच्च दाबाची जमिनीखालून जाणारी पेट्रोलची पाइपलाइन सासवडच्या हद्दीत 23 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी पाइपलाइनला होल पाडून पेट्रोल चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्यक्षात पेट्रोल चोरीचा या चोरट्यांचा प्रयत्न फसला. मात्र, पाइपलाइनला पाडलेल्या होलमधून मोठ्या प्रमाणावर पेट्रोलची गळती झाली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्यासह लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांना या गुन्ह्याचा कसून तपास करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार श्री. वायकर यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकासमवेत सराईत आंतरराज्य टोळीतीत सात संशयितांना पिंपरी -चिंचवड पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखा क्रमांक दोनच्या पथकाच्या मदतीने पिंपरी चिंचवड परिसरातून शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले. या सर्वांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे.''
 
सासवडमधील शेतातून पेट्रोलची पाइपलाइन जाणाऱ्या शेतकरी दत्तात्रय लोखंडे यांना हाताशी धरून या टोळीने पेट्रोल चोरीचा हा प्रकार केला आहे. दरम्यान, या टोळीकडून राज्यातील अन्य काही जिल्ह्यांत पेट्रोल चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सर्व संशयितांना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. या कारवाईत लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस नाईक संतोष नाळे, पोलिस हवालदार श्रीनाथ कदम, सहायक पोलिस फौजदार अंकुश इवरे, अनिल भोसले, शौकत सिकिलकर, महेंद्र सपकाळ, संजय जाधव, अविनाश शिंदे, सागर धेंडे, अभिजित घनवट, विठ्ठल काळे, नाना होले, ज्ञानदेव साबळे, शशिकांत गार्डे, शिवाजी सावंत, चालक विजय शिंदे आदींनी भाग घेतला होता. पोलिस उपनिरीक्षक गणेश माने तपास करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT