patan 
सातारा

अबब... पाटणमधील घरात घुसला "हा' प्राणी

सकाळ वृत्तसेवा

पाटण (जि. सातारा) ः येथील शहरातील मोरे गल्ली, जुनी पंचायत समिती परिसरात भरवस्तीत अचानक कुत्री पाठीमागे लागल्याने भेदरलेल्या अवस्थेत जखमी भेकर घरात घुसले. स्थानिक युवकांनी त्याला पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले. त्या भेकरास पशुवैद्यकीय दवाखान्यात प्राथमिक उपचार केल्यानंतर नैसर्गिक अधिवासात सुरक्षितस्थळी सोडून देण्यात आले. 

याबाबत अधिक माहिती अशी ः काल (ता. 27) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास भटकी कुत्री पाठीमागे लागल्याने अडीच वर्षे वयाचे भेकर पाटण शहरातील मोरे गल्ली परिसरात घरात शिरले. संजय मोरे, सूरज घाडगे, गणेश मोरे, ऍड. अमितराज मोरे, ऋतिक मोरे, अजय मोरे, महेश मोरे, सागर मोरे, सूरज मोरे, अक्षर मोरे, राम मोरे, दिग्विजय शिंदे, हर्ष महाजन, अधिक देसाई या स्थानिक युवकांनी भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या भेकरास कुत्र्यांच्या तावडीतून सोडविल्यानंतर पाटण वन विभागाला माहिती दिली. 

पाटणचे वनाधिकारी विलासराव काळे यांच्यासह वनपाल ए. पी. जाधव, जयवंत कवर, वनरक्षक वर्षा चौरे, वन मजूर सुरेश पवार आदी घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत असलेल्या भेकरास ताब्यात घेतल्यानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मार्गदर्शक सुशांत शिंदे, वन्यजीव रेस्क्‍यूअर महेश पवार, वन्यजीवप्रेमी हवालदार शरद गुरव यांच्या मदतीने भेकरास पशुवैद्यकीय दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर भेकरास सुरक्षितस्थळी नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Kolhapur visit cancelled : अमित शहांचा कोल्हापूर दौरा रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने हुबळीतून दिल्लीकडे रवाना

धावती लोकल पकडायला गेला, अचानक तोल जाऊन ट्रेनखाली येणार इतक्यात...; RPF जवानांनी तरुणाला दिले जीवनदान, Video Viral

Babasaheb Patil RBI action : सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ?

Western Ghats Biodiversity : सह्याद्रीच्या कुशीत दडलाय अमूल्य खजिना! आजरा परिसरात सापडल्या शेकडो दुर्मीळ औषधी वनस्पती; टाटा संस्थेकडून सर्वेक्षण

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT