accident  Sakal
सातारा

सातारा : शेरेवाडीजवळील अपघातात गोंदवलेचे बहीण-भाऊ ठार

दहिवडी - बिदाल रस्त्यावर शेरेवाडीनजीक झालेल्या चारचाकी व दुचाकीच्या भीषण अपघात

रुपेश कदम

दहिवडी : दहिवडी - बिदाल रस्त्यावर शेरेवाडीनजीक झालेल्या चारचाकी व दुचाकीच्या भीषण अपघातात बहीण भाऊ जागीच ठार झाले, तर बहिणीची लहान मुलगी जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, गोंदवले बुद्रुक येथील अविनाश जाधव (वय १६) व शुभांगी पाटोळे (वय २२) हे बहीण भाऊ दहिवडी येथील विटभट्टीवर मजूरीचे काम करतात. आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कामाचे पैसे आणण्याकरीता ते दोघे शुभांगी यांच्या दीड वर्षाच्या मुलीला घेवून दुचाकीवरुन बिदाल या गावाकडे निघाले होते. दहिवडी वरुन बिदालकडे जात असताना शेरेवाडी येथील ओढ्याशेजारी भरधाव वेगातील चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीसह हे बहीण भाऊ व मुलगी हवेत उडाले. दुचाकी रस्त्यापासून दूरवर जावून पडली. या भीषण अपघातामध्ये बहीण भाऊ जागीच ठार झाले. तर त्यांच्यासोबत असणारी शुभांगी यांची दीड वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली.

दहिवडी-फलटण रस्त्यावरील अपघातात दोन मृत्यूमुखी पडल्याच्या घटनेस अजून आठवडा झाला नाही. तोपर्यंत झालेल्या या दुसऱ्या अपघातात सुध्दा दोघे जागीच ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

'बिग बॉस मराठी ६' मध्ये होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री; रितेश देशमुखसोबत केलंय काम; कोण आहे ती?

Dhule Municipal Election : धुळ्यात मतदानापूर्वीच भाजपचा गुलाल! दोन महिला उमेदवार बिनविरोध; विरोधकांना मोठा धक्का

Narayangaon Protest : जीवघेणी बेकायदेशीर ऊस वाहतूक कधी थांबणार; डिसेंबर महिन्यात दोन महिलांचा मृत्यू; धनगरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन!

SCROLL FOR NEXT