Satara Latest Marathi News Satara Agricultural News 
सातारा

ढगाळ वातावरणाचा कोरेगाव तालुक्‍याला जबर फटका; पावसामुळे ज्वारी, गहू, कांदा पिकाचे मोठे नुकसान

राहुल लेंभे

पिंपोडे बुद्रुक (जि. सातारा) : कोरेगाव तालुक्‍याच्या उत्तर भागात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाने ज्वारीचे पीक भुईसपाट झाले असून, शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण आहे.

गुरुवारी व शुक्रवारी दोन दिवस दुपारी सर्कलवाडी, चौधरवाडी, वाघोली, सोनके, पिंपोडे बुद्रुक, करंजखोप, रणदुल्लाबाद, दहिगाव या गावांच्या शिवारात चांगला पाऊस झाला. वारा व पावसाने जोमदार वाढलेले ज्वारीचे पोटऱ्यात आलेले पीक भुईसपाट झाले आहे. पोटऱ्यात पाणी गेल्यास कणीस उमलण्याआधीच कुजून जाण्याची भीती आहे. धुके व पावसामुळे स्ट्रॉबेरी पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला असून, करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

अवकाळीने हातातोंडाशी आलेली रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, घेवडा, कांदा आदी पिके अडचणीत आली आहेत. ढगाळ वातावरण व पाऊस या दुहेरी संकटाने तालुक्‍यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. कोरोनामुळे केलेल्या लॉकडाउनने कोलमडून पडलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकडून मोठ्या उत्पन्नाच्या अपेक्षा होत्या. अवकाळी पावसाचे संकट दूर व्हावे याकरिता शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी तातडीने हालचाली कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT