Satara Latest Marathi News 
सातारा

फळबाग लागवडीत खटाव तालुका आघाडीवर; 'महात्मा गांधी रोजगार हमी'चे उद्दिष्ट पूर्ण!

विकास जाधव

काशीळ (जि. सातारा) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत 2020-21 मध्ये फळबाग लागवडीचे 50.53 टक्के उद्दिष्ट साध्य झाले. जिल्ह्यात यंदा 3,760 हेक्‍टरवर फळबाग लागवडीचे लक्ष होते. त्यापैकी 1915.28 हेक्‍टरवर फळबाग लागवड झाली. त्यामध्ये खटाव तालुक्‍याने आघाडी घेतली आहे. 

फलोत्पादन संचालनालय, ग्रामपंचायत व कृषी विभागातर्फे वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी पडीक जमीन, सलग जमीन व बांधावर फळबाग लागवडीसाठी "मनरेगा'तून प्रोत्साहन देण्यात येते. फळबाग लागवड योजनेंतर्गत आंबा, काजू, चिकू, पेरू, डाळिंब, संत्री, मोसंबी, लिंबू, नारळ, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, कोकम, फणस, अंजीर, सुपारी या फळझाडांची लागवड करण्यात येत आहे. लागवडपूर्व मशागत, लागवड, संगोपन करण्यासाठी मजुरी, रोपे, खते यासाठी तीन वर्षांच्या कालावधीमध्ये पीकनिहाय निधी दिला जातो. या योजनेतून बांधावर फळ लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल जास्त आहे. 

जिल्ह्यात यंदा 3,760 हेक्‍टरवर फळबाग लागवडीचे लक्ष होते. त्यापैकी 2,697 शेतकऱ्यांनी 1915.28 हेक्‍टरवर फळबाग लागवड केली असून, उद्दिष्टाच्या 50 टक्के क्षेत्र साध्य झाले आहे. खटाव तालुक्‍यात सर्वाधिक 892 शेतकऱ्यांनी 390.58 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. तालुकानिहाय लागवड क्षेत्र (हेक्‍टर) ः सातारा 146.32, कोरेगाव 200.25, खटाव 390.58, वाई 160.89,महाबळेश्वर 70.45, खंडाळा 136,72, जावळी 62.07, कऱ्हाड 178.33, पाटण 184.84, फलटण 255.08, माण 129.75. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

Duleep Trophy: शमी-मुकेशच्या माऱ्यासमोर दक्षिण विभागाची दाणादाण; पण पडिक्कल पाठोपाठ तिलक वर्माची झुंज, ठोकली तिसरी फिफ्टी

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

VIDEO: फार्महाऊसवर बिबट्याची एन्ट्री, मनसेच्या नेत्याचा पाळीव कुत्रा 'रॉकी'ची थरारक झुंज; घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT