Satara 
सातारा

बेड मिळत नसल्याने कोरोनाग्रस्त काढताहेत "आशां'वर राग!

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोना रुग्णांचे निदान तातडीने होऊन मृत्यू रोखण्यासाठी प्रशासनाच्या आदेशानुसार आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन सर्व्हे करत आहेत. त्यांच्याकडून संसर्गाची लक्षणे दिसल्यास संबंधितांना तातडीने स्वॅबसाठी त्या रुग्णालयात पाठवतात. त्या चाचणीत रुग्ण पॉझिटिव्ह आल्यावर त्याला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही. त्यामुळे तपासणी करून उपचारही मिळणार नसेल तर उपयोग काय, असा सवाल रुग्णांकडून आशांना विचारला जात आहे. त्यातून बेड न मिळाल्याचा राग प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या आशा स्वयंसेविकांवर काढण्याचे प्रकार घडत आहेत. जीवावर उदार होत काम करूनही गावातच "टार्गेट' केले जात असल्याने त्या हताश झाल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनीच आता याचा सोक्षमोक्ष लावण्याची गरज आहे. 

कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून आजवर आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन सर्व्हेचे काम चोखपणे बजावत आहेत. कोरोना विषाणू संसर्ग संशयितांची माहिती जमा करणे, त्यांना उपचारासाठी पाठवणे यांसह त्यांची नियमित 72 प्रकारची वेगवेगळी आरोग्यविषयक कामे त्यांना करावी लागत आहेत. त्याबदल्यात त्यांना तुटपुंजे मानधन दिले जाते. त्यांच्याकडून सुरू असलेल्या या सर्व्हेमुळे आरोग्य विभागाला संबंधित रुग्णांची माहिती तत्काळ मिळण्यास मोठी मदत होत आहे. त्या आकडेवारीवरच प्रशासनाकडून आवश्‍यक त्या पुढील उपाययोजना केल्या जात आहेत.

त्याचबरोबर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना रुग्णांचे निदान तातडीने होण्यासाठी संसर्गाची लक्षणे दिसल्यास संबंधितांना तातडीने स्वॅब देण्यासाठी रुग्णालयात पाठवावे, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन सर्व्हे करून अशा रुग्णांना स्वॅबसाठी रुग्णालयात पाठवतात. अनेक जण आशांनी सांगूनही भीतीपोटी स्वॅबला जात नाहीत. त्यानंतर त्यांना विनंत्या करून आशा स्वयंसेविका स्वॅबला पाठवतात. तेथे स्वॅब दिल्यावर रुग्णाचे निदान पॉझिटिव्ह आल्यावर त्याला ऍडमिट होण्याची गरज असते. मात्र, सध्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे तपासणी करून उपचारच मिळत नाही. त्यामुळे तपासणी करून तरी काय उपयोग, असा प्रश्न रुग्णांसमोर आहे. 

बेड मिळणार नव्हते तर आम्हाला स्वॅबला तरी कशाला पाठवायचे, काही बरे वाईट झाले तर तुम्हाला जबाबदार धरू, यांसह अन्य त्रासदायक बोलणे आशांना खावे लागत आहे. बेड न मिळाल्याचा राग प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या आशा स्वयंसेविकांवर काढला जात असल्यामुळे त्यांनाही मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. संकट काळात सर्व्हेचे काम करूनही गावातच "टार्गेट' केले जात असल्याने त्यांच्यापुढे आता नवीनच प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर आता जिल्हाधिकाऱ्यांनी उतारा काढावा, अशी मागणी होत आहे. 


पॉझिटिव्ह रुग्णांचा मोजतात ऑक्‍सिजन 

आशा स्वयंसेविकांनी पॉझिटिव्ह रुग्णांचा ऑक्‍सिजन मोजू नये, असे स्पष्ट निर्देश आरोग्य विभागाचे आहेत. मात्र, काही ठिकाणी होम आयसोलेट केलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांचा पल्स रेट आणि ऑक्‍सिजन पातळी आशांनाच मोजण्यास सांगतिले जात आहे. एकतर प्रशासनाकडून आशांना पीपीई किट, सुरक्षेची साधने देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची ऑक्‍सिजन लेव्हल तपासताना त्यांच्या सुरक्षेचे काय हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mangalwedha News : सोलापूर जि. प. अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव, मंगळवेढ्यातील हालचालीना गती

Pachod Accident : दुचाकींची समोरासमोर धडक; तिघे जण गंभीर जखमी

Latest Marathi News Updates Live : ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे टळली मोठी लूट

OBC Quota Conflict: सक्षम खातील, दुर्बल बघत राहतील... मूळ ओबीसींच काय होणार? नेपाळसारखी परिस्थिती अन्...; आरक्षण अभ्यासकांचा इशारा

Digital Minister: मंत्रिपदाची जबाबदारी 'एआय'वर; टेंडर्सवर ठेवणार नजर, भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT