सातारा

सातारा पालिकेत लाखाेंची लाच घेताना उपमुख्याधिकारी धुमाळ जाळ्यात; कायंगुडे, यादव, टोपेंवरही गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कचरा वाहतूकीच्या घंटागाड्यांच्या टेंडरपोटी नगरपालीकेकडे असलेले 15 लाख रुपये परत देण्यासाठी दोन लाख 30 हजार रुपयांची लाच स्विकारताना सातारा पालिकेचे उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांना आज (साेमवार) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. पैशाची मागणी करण्यात सहभागी असलेल्या तीन आरोग्य निरीक्षकांवरही गुन्हा दाखल झाला आहे.
 
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक अशोक शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत तक्रारदार हा घंटागाडीचा ठेकेदार होता. सातारा पालिकेचे घंटागाडी टेंडरमधील 15 लाख रुपये अनामत रक्कम म्हणून पालिकेकडे होते. ते पैसे मिळण्यासाठी तक्रारदाराने मागणी केली होती. हे पैसे देण्यासाठी संचित कृष्णा धुमाळ (वय 33, सध्या रा. केसरकर पेठ, मुळ जोगवडी, ता. भोर) यांनी दोन लाख 30 हजार रुपयांची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारादाने एलसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार केलेल्या पडताळणीमध्ये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आज दुपारी सातारा पालिकेत सापळा लावला होता. त्यामध्ये दोन लाख 30 हजार रुपयांची लाच स्विकारताना संचितला अटक करण्यात आली.
 
दरम्यान, या गुन्ह्यामध्ये पालिकेचे आरोग्य निरीक्षक प्रवीण एकनाथ यादव (वय 51, रा. करंजे पेठ, सातारा) व गणेश दत्तात्रय टोपे (वय 43, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) व राजेंद्र कायंगुडे (रा. एसटी कॉलनीचे मागे, गोडोली, सातारा) यांचाही सहभाग असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया शहर पोलिस ठाण्यात सुरू होती. सातारा पालिकेत वरिष्ठ अधिकारी व तीन आरोग्य निरीक्षकांसह चौघांवर एकाच वेळी कारवाई होण्याची ही पहिलीच घटना आहे. अशोक शिर्के, निरीक्षक अविनाश जगताप व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन उपअधिक्षक अशोक शिर्के यांनी केले आहे.

काॅंग्रेस एकनिष्ठ आमदार भाजपच्या गोटात ?

जिल्हाधिकारीसाहेब हॉटेल, रेस्टॉरंट सुरू करण्याची परवानगी द्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Duleep Trophy Final : तिलक वर्मा एकटा लढला, शतकाला एका धावेने हुकला; इशानच्या संघाकडे ३७२ धावांची आघाडी Video

रिल्सचा नाद, इंटरनेट सारखं बंद पडल्यानं व्हिडीओ अडकायचे; ५२ वर्षीय महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

बापरे! कांदा-लसूण सुद्धा खात नाही अक्षय कुमार; दर सोमवारी असतो उपवास, नक्की कारण काय?

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT