Satara Sakal
सातारा

Satara : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागु झालीच पाहिजे; बाळासाहेब थोरात

राज्यात राष्ट्रपती राजवट लागु करावी अशी मागणी केली आहे. ते म्हणाले, कॉंग्रेसला आता विरोधीपक्षपद मिळेल असे. मात्र ते कोणाला द्यायचे याचा निर्णय कॉंग्रेसचे श्रेष्ठी घेतील.

हेमंत पवार -सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड - महाराष्ट्र राज्यात ज्या पध्दतीने भाजपने सरकार बनवले आहे, ज्या पध्दतीने राज्याचा कारभार सरकारकडुन चालला आहे आणि ज्या पध्दतीने सर्व विभागात भ्रष्टाचार सुरु झाला आहे त्यामुळे सहाजीकच राज्यात सर्वसामान्यांनाही राष्ट्रपती राजवट लागु झाली पाहिजे असे वाटत आहे. त्यामुळे कॉंग्रेस म्हणुन आम्ही राष्ट्रपती राजवट लागु करण्याची मागणी केली आहे, असे स्पष्ट मत माजी महसुलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

कऱ्हाड (जि.सातारा) दौऱ्यावर आले असता ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, भाजपने आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर जाणार नाही असे भाजपने अनेकदा जाहीर केले होते. मात्र अनेकवेळा जे त्यांनी जाहीर केले त्याच्या उलटेच ते वागले आहेत.

राज्याचा कारभारही असाच सुरु आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष म्हणुन आम्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लागु करावी अशी मागणी केली आहे. ते म्हणाले, कॉंग्रेसला आता विरोधीपक्षपद मिळेल असे. मात्र ते कोणाला द्यायचे याचा निर्णय कॉंग्रेसचे श्रेष्ठी घेतील. कॉंग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही. विधानसभा आणि लोकसभेला निवडणुकीला एकजुटीने सामोरे जावुन कॉंग्रेस पक्ष राज्यात नंबर एकवर आम्ही आणु.

विलासकाकांचे कॉंग्रेससाठी मोठे योगदान

जेष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचे नेतृत्व मी अनेक वर्षे पाहिले आहे, असे सांगुण आमदार थोरात म्हणाले, काकां अत्यंत स्पष्टवक्ते होते. कोणतीही गोष्ट करताना चांगल्या पध्दतीने झाले पाहिजे असे त्यांचे तत्व होते.

कॉंग्रेस पक्षासाठी भक्कम विचार मांडुन त्यादृष्टीने वाटचाल करणारे ते व्यक्तीमत्व होते. त्यांचे पक्षासाठी मोठे योगदान होते. कॉग्रेस पक्षाच्या संदर्भात राज्यात जेव्हा चर्चा होते त्यावेळी विलासकाकांचे नाव कायम अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या जयंतीदिनी मी आवर्जुन अभिवादनासाठी आलो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT