Shivendraraj Bhosale vs Udayanraje Bhosale esakal
सातारा

Bazar Samiti Results : विजयानंतर मिशीला मारला पीळ अन् थोपटलं दंड; साताऱ्यात शिवेंद्रराजेचं 'किंग'

आता पुन्हा एकदा आय ॲम द किंग असल्याचं शिवेंद्रराजेंनी दाखवून दिलंय.

सकाळ डिजिटल टीम

शिवेंद्रराजेंना हजारो कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेत गुलालाची उधळण करत जणू विधानसभेचा माहोलच तयार केला.

सातारा : साताऱ्याच्या राजकारणात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे (Shivendraraj Bhosale) विषय नवीन नाहीये. आता पुन्हा एकदा आय ॲम द किंग असल्याचं शिवेंद्रराजेंनी दाखवून दिलंय.

साताऱ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी शेतकरी संघटनेच्या शिलेदारांच्या माध्यमातून बाजार समितीच्या निवडणुकीत शिवेंद्रराजेंना पराभूत करण्याची रणनीती आखली होती. प्रत्यक्ष स्वतः पॅनल न उभं करता शेतकरी संघटनेला तुम्ही पुढं चला, आमचा आरमार तुमच्या बरोबर आहे, असं सांगत थेट निवडणुकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ताकद दिली.

त्यामुळं सातारा जिल्ह्याला (Satara Bazar Samiti Election Results) या निकालाची उत्सुकता होती. दरम्‍यान, एक मे महाराष्ट्र दिनाला सकाळच्या सत्रातच पटापट निकाल बाहेर आले आणि विरोधकांचा फुगा फुटला. निकाल बाहेर येताच शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला.

एकच राजे बाबा राजे.. कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण

एकच राजे बाबा राजे म्हणत शिवेंद्रराजांच्या कार्यकर्त्यांना विजयाच्या उत्साहात आकाश ठेंगणं वाटू लागलं. तितक्यात 18/0 चा नारा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर प्रत्यक्ष मैदानात किंग मेकर शिवेंद्रराजे उतरले. शिवेंद्रराजे निवडणूक निकाल मैदानात येताच कार्यकर्त्यांना उत्साहाला उधाण आलं.

शिवेंद्रराजेंनी मिशीला दिला पीळ

शिवेंद्रराजेंना हजारो कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेत गुलालाची उधळण करत जणू विधानसभेचा माहोलच तयार केला. दोन्हीही हाताची व्हिक्टरी करत नकळत शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंच्या दिशेनं दाखवली. उत्साहात भारावून गेलेल्या कार्यकर्त्यांना आनंदाचा जल्लोष आवरेना. यातच शिवेंद्रराजेंनी आधी आपल्या मिशीला पीळ दिला, नंतर दंड थोपटला व साताऱ्यात कार्यकर्त्यांच्या उत्साहात आपला जलवा दाखवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Squad: रोहित शर्माच्या सोबतीला सलामीसाठी दोन पर्याय! IPL 2026 Auction नंतर मुंबईचा संघ; तगडी Playing XI

Yavatmal News : बोगस मतदारांनंतर जन्म मृत्यूचीही बोगस नोंद? गावची लोकसंख्या दीड हजार, पण नोंदी २७ हजारापेक्षा जास्त; मुंबई कनेक्शन समोर...

Gevarai BJP Leader Balraje Pawar Arrest: गेवराईत भाजपच्या बाळराजे पवारांना मध्यरात्री अटक ; नगरपालिका मतदानाच्या दिवशी झाला होता राडा!

Thane News: उंच टॉवर, स्नो पार्क, टाउन पार्क आणि... ठाण्याच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होणार, भव्य प्रकल्पांची घोषणा

किती घाण दाखवताय... मराठी मालिकेतील नवऱ्याचा क्रूरपणा पाहून प्रेक्षक संतापले; म्हणतात- आताचे पुरुष असे आहेत?

SCROLL FOR NEXT