कऱ्हाड (जि. सातारा) : प्राथमिक लक्षणे असणाऱ्यांसह लक्षणे विरहित कोरोनाबाधितांना पार्ले येथील कोरोना केअर सेंटरला पाठवले जाते. मात्र, तेथे जेमतेम उपचार केले जात आहेत. या सेंटरची 150 बाधितांवर उपचाराची क्षमता आहे. तेथील यंत्रणा सतर्क असल्याचा आरोग्य विभागाच्या दावा आहे. मात्र, आख्खे केअर सेंटर, कोरोनाबाधित तेथील परिचारिका कर्मचाऱ्यांच्या हवाल्यावर आहे, अशीच स्थिती आहे.
ज्यांना लक्षणे नाहीत. मात्र, जे लोक कोरोनाबाधित आहेत परंतु, त्यांच्या घरात ते होम आयसोलेट होऊ शकत नाहीत, अशा रुग्णांना पार्ले केअर सेंटरला हलवले जाते. सध्या तेथे 150 कोरोनाबाधित आहेत. मात्र, तेथे सेवांची आबाळ आहे. तज्ज्ञ डॉक्टर फिरकत नाहीत. परिचारिकाच उपचार करतात. कर्मचारी रुग्णांना औषधे देतात आणि औषधांचाही तुटवडा आहे. कोरोनाबाधितांना वाफारा, गरम पाण्याचा वापर करण्याच्या सूचना आहेत. मात्र, या सेंटरला गरम पाण्याचीही कमतरता आहे. पोषक आहारही दिला जात नसल्याच्या तक्रारी आहेत. तेथे वेळेत नाष्टा, चहा, जेवण दिले जात नाही. दिले तरी त्यातील पोषणमूल्य कमी असते.
आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत. मात्र, तेथे नेमका उपचार काय असतो, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. रुग्ण दाखल झाल्यानंतर दोन, तीन दिवस जुजबी उपचार केले जातात. सकाळ, संध्याकाळी पीपीई किट घालणारे येतात. ते कोण आहेत, याची कल्पनाच दिली जात नाही. आरोग्य विभाग मात्र रुग्ण देखरेखीखाली आहे, एवढे साचेबद्ध उत्तर देतात. येथे रुग्णवाहिका आहे. मात्र, तीही वेळेत नसते. रुग्णाच्या परिस्थितीवर उपचाराची पद्धत ठरते आहे. तेथे खोकला, पित्तशामक, लिव्हरटॉनिक या आजारावरील औषधे अपुरी आहेत. सेंटरमधील कोरोना संसर्गाची तपासणी, आयसोलेशन, उपचार अशा सगळ्या पातळ्यांवर गोंधळ आहे. सेंटरला प्राथमिक उपचार व तपासणी वगळता तातडीच्या उपाययोजना नाहीत.
""कोरोनाची लक्षणे नसलेले रुग्ण आपण पार्ले सेंटरला हलवतो. तेथे जास्त त्रास झाल्यास संबंधिताला रुग्णालयात हलवले जाते. सध्या तेथे रुग्णांची वेळेत तपासणी, त्यांना सकस जेवणाची सोय, पाण्याची सोय व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे तेथून रुग्ण बरे होत आहेत. तेथे स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी व अन्य स्टाफही दिला आहे.''
-उत्तम दिघे,
प्रांताधिकारी, कऱ्हाड
संपादन : पांडुरंग बर्गे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.