Accident sakal
सातारा

सातारा : कारने धडक दिल्याने भिवडीच्या शिक्षकाचा मृत्यू

मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या दोघांना कारने धडक दिली. यामध्ये एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाले आहेत.

प्रवीण जाधव - सकाळ वृत्तसेवा

सातारा : मोळाचा ओढा येथे आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या दोघांना कारने धडक दिली. यामध्ये एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाले आहेत.

अनिल रामचंद्र दरेकर (मूळ रा. भिवडी, जा. जावळी) असे मृत शिक्षकाचे नाव आहे, तर दशरथ फरांदे (पूर्ण नाव नाही. रा. सैदापूर, सातारा) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. जखमीवर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तामजाईनगरमधील शिक्षक अनिल दरेकर हे दररोज सकाळी फिरण्यासाठी जात होते. आज सकाळीही ते नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. पहाटे सहाच्या सुमारास मोळाचा ओढा परिसरातील रस्त्याने जात होते. या वेळी त्यांच्याबरोबर अन्य काही जण होते. मोळाचा ओढा-सैदापूर रस्त्याने जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कारने चालणाऱ्यांपैकी दोघांना धडक दिली. त्यानंतर जागेवर न थांबता वाहनचालक जोरात वाहन घेऊन पळून गेला.

नागरिकांनी जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अपघाताची माहिती पोलिस व अनिल यांच्या नातेवाइकांना दिली. त्यानंतर नातेवाइक अपघातस्थळी आले. अपघातात अनिल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, तर दशरथ यांच्या पायाला लागले आहे. अनिल यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. फरांदे यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताबाबत मनोज परशुराम इंगवले (रा. किडगाव, ता. सातारा) यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी वाहनचालकावर गुन्हा नोंद झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : 'काही तरी प्लॅनिंग सुरूय...' वडिलांना आधीच सावध केलं होतं; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा मोठा दावा

Apple Pay आता भारतात सुरू; Axis Bankच्या कार्डधारकांना मिळणार सुविधा, जाणून घ्या कसं वापराचं

‘सारेगमप’चं शूटिंग संपवून ट्रेनने घरी निघाले, अन् पहिले पीरियड्स आले'; श्रेया घोषाल आठवण सांगत म्हणाली, 'वडिलांनी पॅड आणलं आणि..'

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

Uttarakhand: स्कूटी चालवून महिला कमावताहेत २० हजार रुपये! फ्लिपकार्ट, मिंत्रा ते ब्लिंकिट-स्विगीमध्ये संधी

SCROLL FOR NEXT