covishield vaccine available
covishield vaccine available  Twitter
सातारा

सातारकरांनाे! जाणून घ्या कधी घ्यायचा कोविशिल्डचा दूसरा डोस

सिद्धार्थ लाटकर

सातारा : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ज्या नागरिकांनी पूर्वी कोविशील्ड (covishield) या लसीचा पाहिला डोस घेतला आहे. त्यांना ता. 15 मे पासून कोविशील्ड या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवड्याच्या दरम्यान (84 ते 112 दिवस ) देण्यात येणार आहे. याबाबतचा बदल कोविन ऍपमध्ये (cowin app) 14 मे च्या मध्यरात्रीपासून करण्यात येणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले. (satara breaking news covishield second dose 84 days)

कोवॅक्‍सिनच्या पहिल्या व दुसऱ्या डोसच्या अंतरामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नसुन त्याचे लसीकरण पूर्वी प्रमाणेच सुरु राहणार आहे. सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी ज्यांचा कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस घेवून 84 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यांनी पुढील दुसरा डोस घेण्याकरीता लसीकरण केंद्रावर जावे. परंतु ज्यांचे 84 दिवस पूर्ण झालेले नाहीत, त्यांनी लसीकरण केंद्रावर अनावश्‍यक गर्दी करु नये, असे आवाहनही डॉ. आठल्ये यांनी केले आहे.

सातारा जिल्ह्यात आज पर्यंत सहा लाख 89 हजार 206 नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. यामध्ये पहिला डोस (5,85,940) , दुसरा डोस (1,03,266) पुर्ण झालेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT