satara crime
satara crime esakal
सातारा

धक्कादायक! आर्मीतील व्यक्तीचा अवघ्या 8 वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग

बाळकृष्ण मधाळे

सातारा : वास्को निजामुद्दीन एक्सप्रेसमधून (Vasco Nizamuddin Express) प्रवास करणाऱ्या अवघ्या 8 वर्षाच्या मुलीवर एका आर्मीतील (Army) व्यक्तीनं तिच्यावर अतिप्रसंग करत रेल्वेतून तिला बाहेर फेकून दिलं आहे. साताऱ्यातील लोणंद-वाठार स्टेशन (Lonand-Wathar Station) मार्गावर ही धक्कादायक घटना घडलीय. रात्री अतिप्रसंग करताना आरडाओरडा केला म्हणून रेल्वेतून त्या पीडित मुलाला बाहेर फेकल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, पोलिसांनी जखमी मुलीला सातारा जिल्हा रुग्णालयात केले दाखल असून आरोपीला अवघा दहा तासात अटक केल्याची माहिती पुणे रेल्वे पोलिस (एसपी) सदानंद वायसे-पाटील (Police Sadanand Wayse-Patil) यांनी दिली. (satara breaking news minor girl thrown from vasco nizzamuddin express near lonand wathar station)

वास्को निजामुद्दीन एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या अवघ्या 8 वर्षाच्या मुलीवर एका आर्मीतील व्यक्तीनं तिच्यावर अतिप्रसंग करत रेल्वेतून तिला बाहेर फेकून दिलं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सदर पीडित मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत दिल्लीला जात होती. रात्री झोपच्या वेळी आर्मीमधील एका व्यक्तीनं त्या पीडित मुलीस झोपेत असतानाच बाथरुममध्ये उचलून नेले. तिथे नेल्यावर तिच्यावर अतिप्रसंग करायला सुरुवात केली. परंतु, यादरम्यान मुलीला जाग आली. त्यावेळी तिने त्या व्यक्तीच्या तावडीतून सुटण्यासाठी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदर व्यक्तीने 'मी तुला तु्झ्या कुटुंबाकडे नेतो', असे समजावण्याचा प्रयत्न केला व तिला दरवाजाजवळ घेऊन जात रेल्वेतून बाहेर फेकून दिले. सुदैवाने रेल्वेचे स्पीड कमी असल्याने त्या पीडित मुलाला कोणतीही इजा झाली नाही. परंतु, तिथे असलेल्या पोलिसांनी त्या मुलीला सातारा शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

सविस्तर माहिती अशी, वास्को निजामुद्दीन गाडी गोव्यावरुन सुटल्यानंतर, ती साताऱ्याला रात्री दीड वाजता पोचते. दीड वाजता सातारा पास करुन लोणंदला जाते. याच अर्ध्या तासाच्या दरम्यान एस-7 जो डबा आहे. ज्यात 25, 26, 27 आणि 28 नंबरच्या डब्यातून एक फॅमिली प्रवास करत होती. मात्र, पास्को कायद्यांतर्गत आपल्याला कोणाची नावं सांगता येत नाहीत, असे पोलिसांनी सांगितले. त्या फॅमिलीमधील कर्ता हा नेव्हीमधून (Navy) निवृत्त झाला होता. निवृत्तीनंतर ते आपल्या तीन मुलींसह दिल्लीला जात होते. रात्री जेवण झाल्यानंतर ही मुलगी झोपली होती. यावेळी आरोपीनं, त्या मुलीला झोपेतूनच उचलून नेत बाथरुमध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्यास सुरुवात केली. त्या मुलीनं आरोपीच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याला लाथाबुक्या मारल्या. मात्र, ती आरोपीच्या तावडीतून सुटू शकली नाही. त्या आरोपीनं तिच्यावर अतिप्रसंग करत असतानाच तिला रेल्वेतून बाहेर फेकून दिलं. योगायोगानं आदर्की घाटाचा रस्ता पास झाल्यानंतर, ट्रेनचा स्पीड अवघा वीसचा होता. त्यामुळे मुलीला गंभीर दुखापत झाली नाही, मात्र यात तिचा पाय फॅक्चर झाला आहे. ती मुलगी रेल्वेतून खाली पडल्यानंतर, आज सकाळ सात-साडेसातच्या दरम्यान स्थानिकांना दिसली. यावेळी स्थानिक नागरिकांनी तिच्यावर उपचार सुरु केले व पोलिसांना याची कल्पना दिली.

हा विनयभंगाचा प्रकार असल्यामुळे आम्ही ताबडतोब अॅक्शन घेतली. ही बातमी समजल्या-समजल्या महाराष्ट्र राज्य लोह मार्गाच्या अप्पर पोलिस महासंचालक प्रज्ञा सरोदे (Pradnya Sarode) यांना सर्व घटनाक्रम सांगितला व त्यांनीही सूचना दिल्या, की ही ट्रेन ब्लाॅक करायला पाहिजे. आरोपी बाहेर पडता कामा नये. तद्नंतर आम्ही प्रत्येक स्टेशनवर जवळ-जवळ ४०० हवालदार थांबविले. कोणत्याही प्रवाशांना खाली उतरु दिलं नाही. मुलीनं दिलं वर्णन आणि डब्यातील लोकांनी दिलं वर्णन, असं करुन आम्ही २० लोक व्हेरीफायड केली. त्यातील चार लोक व्हेरीफायड झाली. त्यातल्या मुख्य आरोपीनं त्याचा गुन्हा कबुल केला असून त्याला आम्ही अटक केल्याचे पुणे रेल्वे पोलिस सदानंद वायसे-पाटील यांनी सांगितले आहे. तो आरोपी झाशीतील आर्मीमध्ये काम करत असल्याचेही त्यांनी सांगितलेय.

satara breaking news minor girl thrown from vasco nizzamuddin express near lonand wathar station

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT