सातारा

पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात सिंधुदुर्गचे प्रवासी ठार

तानाजी पवार

वहागाव (जि. सातारा) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वहागाव (ता. कराड) गावच्या हद्दीत चार चाकी व अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात चार  जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याचे पाेलिसांकडून सांगण्यात आले. आज (रविवार) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामधील जखमींना उपचारासाठी कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, एम.एच-07-ए.बी-5610 ही चार चाकी पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरुन कोल्हापूर बाजूकडून पुणे बाजूकडे निघाली होती. दरम्यान वहागाव (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत आल्यानंतर संबंधित गाडी अचानक रस्ता क्राँस करुन कोल्हापूर लेनवर आदळली. त्यावेळी तेथे अज्ञात वाहनाशी झालेल्या धडकेत तीन जण जागीच ठार झाले. अन्य दोन जण गंभीर जखमी झाले हाेते. त्यातील एक जण दुपारी तीननंतर मृत झाल्याचे सांगण्यात आले. संबंधित प्रवाशांची नावे दुपारी सव्वा तीन पर्यंत समजली नव्हती. 

हा अपघात घडला त्यावेळी संबंधित गाडी पुणे बाजूच्या लेनवरुन कोल्हापूर बाजूला जाणाऱ्या लेनवर उभी राहिली. या अपघाताची माहिती समजताच वहागाव परिसरातील ग्रामस्थांनी महामार्ग परिसरात धाव घेऊन जखमींना मदत केली. त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कराडला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान संबंधित वाहन हे सिंधूदूर्ग (कुडाळ) येथील असल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नाेंदणीनूसार असून या अपघातामधील मृत व जखमी व्यक्ती सिंधुदुर्ग (कुडाळ) जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आता जे काही घडेल, ते सातारा - सांगलीतील अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतरच!

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

IND vs WI 5th T20I: चिन्नास्वामीवर Fire Alarm वाजला, भारतीय क्रिकेटपटूच्या फोनवर Emergency Alert अन्...; नेमकं काय घडलं?

Shivneri Kabaddi Tournament: अजिंक्य-साईच्या जोरावर रिजनल स्पोर्ट्स बोर्डाची तिसऱ्या फेरीत धडक, माटुंगा वर्कशॉपचा उडवला धुव्वा

Latest Marathi News Live Update : बुलडाण्यात सर्क्युलर रोडवर धावत्या बसला आग! युवकांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

यू-ट्युब पाहून मुलीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न, नागपूरमधील धक्कादायक घटना; १८ वर्षीय आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT