jawali 
सातारा

कांद्याचा भार आता एसटी पेलणार

सकाळ वृत्तसेवा

लोणंद (जि. सातारा) : एसटी महामंडळाने आता प्रवाशांप्रमाणे एसटीतून मालवाहतुकीस प्रारंभ केल्याने लोणंद बाजार समितीतील कांदाही आता एसटीने राज्यासह देशभर पोचणार आहे. या बाजार समितीतील कांद्याचे व्यापारी राजू आग्रवाल यांनी कांदा कऱ्हाडला पाठवून एसटीतून काद्यांच्या मालवाहतुकीस प्रारंभ केला. 

यावेळी लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दत्तात्रय बिचुकले, सचिव विठ्ठल सपकाळ, सहायक सचिव अमोल शेळके, कांदा व्यापारी राजू आग्रवाल, गोकुळदास शहा, रामदास सोळसकर, कऱ्हाड येथील कांद्याचे व्यापारी संतोष बागल, अमोल कांबळे तसेच कर्मचारी व हमाल उपस्थित होते. 


लोणंद बाजारात दर गुरुवारी व सोमवारी भरणाऱ्या कांद्याच्या बाजारात लोणंद बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी वर्ग बैलगाडी, ट्रक, टेम्पो आदी वाहनांतून कांदा विक्रीसाठी आणतात, तर खरेदी केलेला कांदा व्यापाऱ्यांकडून ट्रक, टेम्पो व आवश्‍यकतेनुसार रेल्वेनेही देशांतर्गत बाजारपेठेत पाठवला जातो. मात्र, एसटीतून आता कांद्याच्या गोण्या दुसऱ्या बाजारपेठेपर्यंत पोचणार आहेत. 


दरम्यान, एसटीने जवळच्या तसेच राज्यातील कोणत्याही बाजारपेठेत मालवाहतूक करण्यास सोपे होणार आहे. वाहतुकीसाठीच्या होणाऱ्या खर्चात 25 टक्के बचत होवून सुरक्षित मालवाहतूक होणार असल्याने व्यापाऱ्यांना निश्‍चितपणे परवडणारे आहे. त्यामुळे पुढील काळात व्यापारी वर्गातून एसटीने माल वाहतूक करण्यास विशेष पसंती मिळेल, असा विश्वासही यावेळी कांदा व्यापारी राजू आग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Air Connectivity : कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद व बंगळूरसाठी नवीन, सुधारित विमानसेवा सुरू; सोयीस्कर प्रवास होणार

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगर ‘ईव्ही हब’ बनणार; अतुल सावे : मराठवाड्याच्या विकासावर परिषदेत मंथन

IPL 2026: RCB घरच्या मैदानात SRH ला भिडणार, पण पहिल्याच सामन्याला हुकमी एक्के मुकणार; जाणून घ्या संभावित Playing XI

Latest Marathi News Live Update : रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार

Marathwada News: मराठवाड्यात कृषी पर्यटनाला चालना ; १५० शेतकऱ्यांची नोंदणी, ११६ कृषी पर्यटन केंद्रांची पाहणी

SCROLL FOR NEXT