सातारा

गंभीर..! सातारा जिल्ह्यातील कोरोना वाॅर्ड फुल्ल

प्रवीण जाधव

सातारा : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील कोरोना विषाणू वॉर्ड फुल्ल झाले आहेत. संस्थात्मक विलगीकरण कक्षातही पॉझिटिव्ह रुग्ण ठेवावे लागत असल्याने खासगी दवाखाने अधिगृहित करण्याची गरज निर्माण झाली असून, प्रशासनाने याबाबत तातडीने हालचाली सुरू करणे आवश्‍यक आहे. 

चौथ्या लॉकडाउनमध्ये शासनाने अनेक निर्बंधामध्ये शिथिलता आणली. त्यानुसार परजिल्ह्यांतून तसेच परराज्यांतून आपल्या गावी किंवा कामाच्या ठिकाणी जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार मुंबई, पुणे व गुजरात व अन्य जिल्हे तसेच राज्यांतून जिल्ह्यात आत्तापर्यंत एक लाखापेक्षा जास्त नागरिक दाखल झाले. परंतु, प्रामुख्याने मुंबई व गुजरातवरून आलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. 

19 मेपर्यंत जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या 146 होती. परंतु, गेल्या आठ दिवसांमध्ये ही संख्या 452 वर पोचली आहे. म्हणजे दोन महिन्यांच्या लॉकडाउनच्या कालावधीत जेवढी संख्या होती, त्यापेक्षा दुप्पट संख्या (306) आठ दिवसांमध्ये वाढली आहे. सुरवातीच्या टप्प्यात वाढलेल्या संख्येमध्ये एकट्या कऱ्हाड तालुक्‍यामधील बाधितांची संख्या शंभरच्यावर होती. अन्य तालुक्‍यांमध्ये तुलनेने फार कमी रुग्णसंख्या होती. त्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्ण दाखल करण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी खास तयार केलेल्या आयसोलेशन वॉर्डमध्ये रुग्णसंख्या कमी होती. मात्र, गेल्या आठ दिवसांमध्ये कऱ्हाडबरोबरच जिल्ह्यातील अन्य तालुक्‍यांमध्ये सापडलेल्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयावर भार वाढला आहे.
 
जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत सापडलेल्या कोरोनाबाधितांपैकी 134 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. सध्या 302 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत प्रामुख्याने जिल्हा रुग्णालय, कृष्णा हॉस्पिटल तसेच कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार होत होते. परंतु, आता या रुग्णालयात उपलब्ध असलेल्या कोरोना वॉर्डच्या क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात तर, डोळ्यांच्या वॉर्डमध्येही रुग्णांना दाखल करण्याची वेळ आली आहे. जिल्हा रुग्णालयात आता सुमारे 72 बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर संशयितांनाही या ठिकाणच्या काही वॉर्डमध्ये ठेवण्यात येत आहे. 

जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कोरोना वॉर्डच्या क्षमतेच्या तुलनेत रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे सुरवातीला संशयित रुग्ण ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्येही पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवावे लागत आहे. अशा परिस्थितीत रुग्णाची तब्येत बिघडल्यास त्याला संस्थात्मक विलगीकरण कक्षातून जिल्हा रुग्णालयात हलवावे लागणार आहे. रुग्णालयातील शासकीय यंत्रणेच्या रुग्णवाहिकांचा वेग पाहिल्यावर रुग्ण किती वेळाने रुग्णालयात पोचेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. कोरोनाबाधित रुग्णांना योग्य दर्जाची सुविधा मिळवून देणे शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी तातडीने खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन ती सर्वसामान्य कोरोनाबाधितांसाठी उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वे मालिका गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात; जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणत्या संघाकडून खेळणार पुढचा सामना

Pune Flood Alert: पुण्यात अलर्ट! खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; बाबा भिडे पूल पाण्याखाली, रस्ता बंद, युवकाची अग्निशामक दलाकडून सुटका

Nanded Water: नांदेडकरांसाठी दिलासादायक बातमी! विष्णुपुरी धरणाच्या पाणीसाठ्यात एका दिवसात 9 टक्क्यांची वाढ, धरणांना जीवदान

Latest Marathi News Live Update : शनिवार आणि रविवारी किल्ले सिंहगड राहणार बंद

Commonwealth Games 2026: सायकल दुरूस्तीचे काम करणाऱ्या बापाच्या लेकीने इतिहास घडवला... ज्युदोत पक्कं केलं पदक, कोण आहे अस्मिता डे?

SCROLL FOR NEXT