Collector Shekhar Singh
Collector Shekhar Singh Sakal
सातारा

आदेशभंग करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई : जिल्‍हाधिकारी शेखर सिंह

गिरीश चव्हाण

सातारा : ओमिक्रॉनचा (Omicron variant) प्रसार रोखण्‍यासाठी राज्‍य शासनाने लागू केलेल्‍या नियमावलीची (Government Rule) जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी करण्‍यात येणार असून, त्‍यासाठीची नियमावली जिल्‍हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनी प्रसारित केली आहे. यात कोरोना प्रतिबंधक नियम आणि आदेशांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत देण्‍यात आले आहेत. (Satara Corona News)

ओमिक्रॉनचा प्रसार देशभरात वाढू लागल्‍याने केंद्र सरकारने केलेल्‍या आवाहनानुसार प्रत्‍येक राज्‍य आपापल्या पातळीवर आवश्‍‍यक त्‍या उपाययोजना राबवत आहे. याच अनुषंगाने काल रात्री राज्‍य शासनाने ता. २५ पासून रात्री नऊ ते सकाळी सहा या कालावधीत संचारबंदी जाहीर केली आहे. पुढील आदेश होईपर्यंत ही संचारबंदी कायम राहणार असून, त्‍यासाठीची नियमावली स्‍थानिक पातळीवर जिल्‍हाधिकारी सिंह यांनी प्रसिद्ध केली आहे.

यानुसार खुल्‍या, तसेच बंदिस्‍त जागी होणाऱ्या सर्व प्रकारच्‍या कार्यक्रमांत सहभागी होणाऱ्यांचे दोन्‍ही वेळचे लसीकरण झाले असणे बंधनकारक करण्‍यात आले आहे. प्रवासासाठीही दोन्‍ही लशींचे बंधन असून, या वेळी नागरिकांनी केंद्र शासनाने लसीकरणानंतर दिलेला युनिव्‍हर्सल पास सोबत बाळगणे आवश्‍‍यक आहे.

याचबरोबर सार्वजनिक वाहतुकीदरम्‍यान प्रवाशांच्‍या सुरक्षितेला संबंधितांनी प्राधान्‍य देणे आवश्‍‍यक असून, वारंवार सूचना देऊनही जर नागरिक, व्‍यावसायिक व इतर कोविड प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करणार नाहीत. त्‍यांच्‍यावर पाचशे ते १० हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची कारवाई करण्‍यात येणार असल्‍याचेही श्री. सिंह यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

  • -विवाह सोहळ्यात शंभरची उपस्‍थिती

  • -सामाजिक, राजकीय कार्यक्रमांवर मर्यादा

  • -हॉटेल, जीम,स्‍पामधील उपस्‍थिती ५० टक्के

  • -पन्नास टक्के आसन क्षमतेवर कार्यक्रमांना परवानगी

  • -संचारबंदीत पाचपेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींना एकत्र येण्‍यास मनाई

  • -मास्‍कसह इतर गोष्‍टींचा वापर सर्वच ठिकाणी करणे बंधनकारक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT