सातारा : लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यामुळे कोरोनाचा जिल्ह्यात उद्रेक कायम आहे. मार्च ते जुलैअखेर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 1336 वर पोचला आहे. गावागावांत कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. आतापर्यंत 11 तालुक्यांतील 393 गावांत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सर्वाधिक गावे सातारा तालुक्यात 68, कऱ्हाड 65, तर वाई तालुक्यातील 42 गावांचा समावेश आहे.जिल्ह्यात एकूण 1719 गावे असून, त्यापैकी 393 गावांत कोरोनाबाधित आढळलेले असून, केवळ 21 टक्के गावातच कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. उर्वरित गावांनी काळजी घेतल्यास ही गावे कोरोनामुक्त राहू शकणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कोरोनाचा पहिला रुग्ण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आढळला. तोही परदेशातून प्रवास करून आलेला होता. त्यामुळे मूळचा बाधित जिल्ह्यात कोणीही नाही. केवळ कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यात सुरवातीला दोन महिन्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता. मात्र, मेमध्ये यामध्ये अचानक वाढ झाली. आता कोरोना बाधितांचा आकडा 1336 वर पोचला आहे. दररोज 20 ते 50 च्या प्रमाणात बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना चाचणीची संख्या वाढल्याने रुग्ण संख्या वाढत आहे. जिल्ह्यात 1719 गावे असून, 1495 ग्रामपंचायती आहेत. आतापर्यंत 393 गावांत कोरोनाचा शिरकाव झाला असून, यामध्ये एकूण 1336 रुग्ण बाधित सापडले आहेत.
सर्वाधिक सातारा तालुक्यातील 68 गावांत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्याखालोखाल कऱ्हाड 65, वाई 42, पाटण 38, तर सर्वात कमी महाबळेश्वर तालुक्यातील 12 गावांत कोरोनाचे रुग्ण सापडलेले आहेत. जिल्ह्यातील 1326 गावे कोरोनामुक्त आहेत. त्याची टक्केवारी 79 टक्के येत आहे. आगामी काळात या गावांनी सामाजिक अंतर, मास्क वापरणे, कोरोना बाधितांच्या संपर्कापासून दूर राहाणे आदी गोष्टी पाळल्या, तर 79 टक्के गावांपर्यंत कोरोना पोचू शकणार नाही. प्रशासकीय पातळीवरूनही अशा कोरोनामुक्त गावांना काळजी घेण्याच्या सूचना करणे आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग जास्त आहे, तेथील प्रत्येकाने काळजी घेऊन संसर्ग टाळण्यावर भर दिला पाहिजे, तरच कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही.
तालुकानिहाय कोरोनाची रुग्ण संख्या अशी आहे. कऱ्हाड 359, सातारा 186, पाटण 129, जावळी 128, वाई 109, फलटण 97, खटाव 94, खंडाळा 66, माण 53, कोरेगाव 53, महाबळेश्वर 30.
रुग्ण संख्येचा आकडा पाहता कऱ्हाड तालुका आघाडीवर दिसत आहे. त्यापाठोपाठ सातारा, पाटण, जावळी, वाई, फलटण, खटाव तालुक्यांचा समावेश आहे. सर्वात कमी रुग्ण महाबळेश्वर तालुक्यात आहेत.
कोरोनाबाधित तालुकानिहाय गावे अशी : सातारा 68, कऱ्हाड 65, वाई 42, पाटण 38, जावळी 35, खटाव 33, कोरेगाव 29, फलटण 29, माण 26, खंडाळा 16, महाबळेश्वर 12.
पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आला नवा आदेश; घराबाहेर पडण्यापूर्वी नक्की वाचा
हाकेच्या अंतरावर बिबट्या दिसला अन..!
हत्ती गेला अन् शेपूट राहिले, 'यांच्या' कर्जमाफीचे पैसे द्यायचे काेणाला?
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.