सातारा

सावधान! साताऱ्याला कोरोनाचा विळखा वाढतोय

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात वाढत असताना गेली अनेक दिवस काही अपवाद वगळता कोरोनापासून बचावलेल्या सातारा शहरात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरवात झाली आहे. लॉकडाउनमधील शिथिलतेमुळे वाढलेली व्यावसायिक आणि दुकानदारांची बेफिकीरता व शहराच्या चौफेर पसरलेल्या रुग्णांमुळे शहराचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांबरोबर प्रशासनानेही सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे. 

जिल्ह्यामध्ये दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 791 रुग्ण सापडलेले आहेत. आरोग्य विभाग व प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे रुग्ण लवकर निदर्शनास येत असल्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे सोपे जात आहेत. लक्षणे नसतानाच उपचार मिळत असल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जिल्ह्यात वाढले आहे. एकूण सापडलेल्या रुग्णांपैकी 593 रुग्णांना पूर्णपणे बरे करण्यात यश आले आहे. जिल्ह्यासाठी ही चांगली गोष्ट आहे. परंतु, लॉकडाउनमधील कडक निर्बंध उठल्यानंतर वाढत चाललेल्या रुग्णसंख्येबाबतही प्रशासनाने गांभीर्याने विचार करणे आवश्‍यक आहे. 
कोरोनाच्या सुरवातीच्या टप्प्यात कऱ्हाड "हॉटस्पॉट' बनलेले होते. 100 पेक्षा जास्त रुग्ण कऱ्हाड तालुक्‍यामध्ये आढळून आले. सध्या तेथील रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु, सातारा शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यापासून सातारा बाधितांपासून लांब होता. मुंबईवरून आलेल्या युवकाकडून बाधा झालेले तिघे सोडले तर, सर्वसामान्य नागरिकांपैकी कोणीही साताऱ्यात बाधित झालेले नव्हते. अन्य दोन रुग्ण आढळले ते आरोग्य विभागाशी संबंधित होते. त्यामुळे शहराला कोरोनाबाधेचा फारसा धोका पोचला नव्हता. परंतु, या आठवड्यात शहर व उपनगरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्याला प्रमुख कारण हे जिल्हा सीमेवर आलेली मरगळ ही आहे. तेथून विनापरवानगी लोक येत आहेत. त्यांची प्रशासनाकडे नोंदणीही होत नाही. त्यामुळे ते क्वारंटाइन राहतात की नाही, यावर नियंत्रण ठेवणे शक्‍य होत नाही.
 
सध्या शहरामध्ये निर्बंध शिथिल करताना प्रशासनाने घालून दिलेल्या कोणत्याच नियमांची व्यावसायिक व नागरिकांकडून अंमलबजावणी होताना दिसत नाही. शारीरिक अंतराचे सर्व नियम धाब्यावर बसवून मंडईसह सर्व दुकाने सुरू आहेत. रस्त्यावर भरणाऱ्या मंडईमुळे शहरात ठिकठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे. त्या ठिकाणी हजारो लोक दररोज खरेदीसाठी जमत आहेत. प्रशासनाने पूर्वी आखून दिल्याप्रमाणे अंतराच्या गोलांचा कुठेच उपयोग होताना दिसत नाही. निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया होत नाही. अशी सर्वत्र अनागोंदीची परिस्थिती असताना पालिका आपल्या अंतर्गत लाथाळ्या व प्रकरणांमध्ये गुंतली आहे. तीन आरोग्य निरीक्षक एकाच वेळी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. त्यामुळे नागरिक व व्यावसायिकांना सांगणार कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत शाहूनगर, मंगळवार पेठ, शाहूपुरी, रविवार पेठ या ठिकाणी रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांच्या संपर्कातील कोणी मार्केटमध्ये फिरल्यास शहरामध्ये रुग्णांची संख्या कोणत्याही क्षणी नक्‍कीच वाढू शकते. 

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा 

सातारा शहर व उपनगरांमध्ये वाढू लागलेल्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत तातडीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. तसेच जिल्हा सीमेवरची शिथिलताही दूर करणे आवश्‍यक आहे.

कोरेगाव शहरासाठी सात कोटींचा निधी

कऱ्हाडला लवकरच शेण्यांवर अंत्यसंस्कार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT