सातारा

पाचगणीतून पळालेल्या काेराेनाबाधित युवतीचा थांगपत्ता लागला पण...

सकाळ वृत्तसेवा

भिलार (जि.सातारा) : पाचगणीच्या बेल एअर कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे पळून गेलेली बाधित युवती मुंबईतील स्वगृही पोचल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पाचगणीकरांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला असला तरी, ती का आणि कशी पळून गेली, हे प्रश्‍न सध्यातरी अनुत्तरित राहिले आहेत.
धक्‍कादायक... पाचगणीच्या रुग्णालयातून बाधित युवतीचे पलायन
 
याबाबत माहिती अशी, की काल पहाटे साडेपाचच्या सुमारास संबंधित 23 वर्षीय युवती अचानक गायब झाल्याने एकच खळबळ उडाली होती. याबाबत पाचगणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. संबंधित युवती चेंबूर (मुंबई) येथून वडिलांच्या उपचारासाठी पाचगणी येथील बेल एअर हॉस्पिटलमध्ये आली होती. परंतु, दाखल करण्यापूर्वीच्या तपासणीत संबंधिताला कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्याच्या घशाचे स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर तो पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यानंतर त्यांचे निकटच्या सहवासात आलेल्या त्याच्या 23 वर्षीय मुलीच्या घशातील स्त्रावाचे नमुने 24 जूनला पाठवण्यात आले. दुसऱ्या दिवशी तोही अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तिलाही बेल एअर हॉस्पिटलमधीलच कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु, उपचार सुरू असताना सहाव्या दिवशीच ही युवती कोरोना केअर सेंटरमधून गायब झाली. 
रुग्णालय प्रशासनाने तिचा शोध घेतला. परंतु, ती सापडत नसल्याने पोलिसात तक्रार दाखल केली. पाचगणीचे सहायक पोलिस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी गायब झालेल्या युवतीचा पाचगणी व परिसरात शोध घेतला. परंतु, ती कुठेही सापडली नाही. सायंकाळी उशिरा तिच्या घरी फोनवरून संपर्क केला असता, ती मुंबईत तिच्या आईकडे पोचल्याचे समजल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला. 

शहरवासीयांना दिलासा 

कोरोनाबाधित युवती गायब झाल्याचे समजल्यावर पाचगणीत घबराट पसरली होती. ती बाजारपेठेत कुठे फिरली का? आणखी कोणाच्या संपर्कात आली का? अशा एक ना अनेक शंका नागरिकांकडून उपस्थित झाल्या. पण, आता ती युवती थेट मुंबईत गेल्याचे समजल्यावर पाचगणीकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

लॉकडाउनमध्ये मधुमेहींच्या नेत्रपटलावर दुष्परिणाम, अंधत्वाच्या प्रमाणातही वाढ, तज्ञ डॉक्‍टरांचा निष्कर्ष

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Lanke Health Update : निलेश लंकेची हेल्थ अपडेट समोर, तब्बेतीत सुधारणा; दगडुशेठ हलवाई गणपतीचे घेतले दर्शन

Pune News: पुणे महापालिकेचा इंधनबचतीसाठी पुढाकार; वाहन वापरात ३० टक्के कपातीचा प्रशासनाकडून प्रस्ताव

Devendra Fadnavis Cabinet Instructions : सार्वजनिक वाहतूक, विमान प्रवासावर मंत्र्यांना बंधणे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाला सूचना

Latest Marathi News Live Update : रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच खासदार नीलेश लंकेंनी घेतलं दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन

सोलापुरात पुन्हा सापडले एमडी ड्रग्ज! मुंबईतून एकजण सोलापुरात आला अन्‌ ९५० ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज देऊन गेला, पोलिसांचे पथक मुंबईला रवाना, वाचा...

SCROLL FOR NEXT