News System
सातारा

सातारकरांनाे! काळजी घ्या, घाबरु नका; आलाय नवा आदेश

सातारा शहर आणि तालुक्यांत गेल्या दिवसांपासून काेराेना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्याधर्तीवर निर्णय घेण्यात आला आहे.

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा तालुक्यात काेराेनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे संचारबंदीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची आता कोरोना चाचणी करण्याची जबाबदारी पालिका आणि पंचायत समितीवर साेपिण्यात आली आहे. याबाबतचा आदेश सातारा तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तहसिलदार आशा हाेळकर यांनी काढला आहे.

गेल्या काही दिवसांपासून विनाकारण फिरणा-यांवर दंडात्मक कारवाईसह वाहन जप्तीची कारवाई पोलिसांनी केली. तरीही त्यांची संख्या कमी होत नव्हती. अखेर फिरणाऱ्यांच्या चाचणीचा निर्णय प्रशासनाने घेतला. सातारा शहर आणि तालुक्यांत गेल्या दिवसांपासून काेराेना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने तात्काळ विनाकारण फिरणाऱ्यांना लगाम बसावा यासाठी काेराना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. पालिका आणि पंचायत समितीने पोलिस आणि आराेग्य विभागाच्या मदतीने ही चाचणी करायची आहे. यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्याचे सूचित करण्यात आले आहे. या आदेशानूसार शहरातील काेणत्याही भागात पथक विनाकारण फिरणा-यांना चाप बसवेल अशी आशा आहे.

चर्चा तर हाेणारच; भागवत कुटुंबियांनी घातले 'स्टेला'चे डाेहाळ जेवण

पुणे मुंबईकरांनाे! एसटी महामंडळाने घेतला महत्वपुर्ण निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT