Satara Latest Marathi News Satara Crime News 
सातारा

पुणे-बंगळूर महामार्गावर दोन महिन्यांत तब्बल 80 अपघात; मुंबई, गोव्याची वाहने सुसाट

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : पुणे ते बंगळूर महामार्गावर अतिवेगवान वाहनांवर महामार्ग पोलिसांनी केलेल्या कारवाईतून मुंबई, पुणे, गोवा व बंगळूर या मोठ्या शहरांतील वाहनधारकांची संख्या सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

महामार्गावर दोन महिन्यांत 81 अतिवेगवान वाहनांचे अपघात झाले असून, त्यात 35 जणांना आपला जीव गमावावा लागला, तर 104 जण जखमी आहेत. या पार्श्‍वभूमीवर महामार्ग पोलिसांनी वर्षभरता 20 हजारहून अधिक वेगवान वाहनांवर केलेल्या कारवाईत दोन कोटींहून अधिक दंड वसूल केला आहे, तरीही वाहनांचा वेग काही कमी होताना दिसत नाही. महामार्गावर वाहनांना ताशी 90 किलोमीटरच्या वेगाला परवानगी आहे. त्यावरील वेगवान वाहने कारवाईच्या कचाट्यात येतात. आटके टप्पा, पाचवड फाटा, वहागाव येथे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत पुणे, कोकणसह गोव्या नजीकच्या वाहनांचा अतिवेगच धोक्‍याचा ठरला आहे. 

वहागाव येथे झालेल्या अपघातातील वाहनांचा वेग ताशी 165 किलोमीटरचा होता. अपघातानंतर कारचे स्पीडॅमीटर ताशी 165 किलोमीटरवर लॉक झाले होते. वाहन पास करण्याची स्पर्धा लावणाऱ्या इनोव्हा, सिफ्ट कार चालकांचा आटके टप्पा येथे रात्री अपघात झाला. तिन्ही वाहने वेगवान होती. अपघातग्रस्त वेगवान वाहने कोकण, मुंबई, गोवा, पुणे येथील होती. त्यामुळे महमार्गावर वेग सोडणाऱ्या वाहनांत मुंबई, पुणे, गोवा व बंगळूरमधील मोठ्या शहरांतील वाहनधारकांची संख्या सर्वाधिक आहे. दंड झालेल्यांमध्येही त्यांची संख्या सर्वाधिक दिसते आहे. 

अतिवेगवान वाहनांकडून असा आला दंड... 

  • 13 महिन्यांत 20 हजार 668 वाहनांकडून दोन कोटी 6 लाख 68 हजार 
  • महामार्ग पोलिसांनी वर्षात 57 हजार 603 वाहनांकडून तीन कोटी 
  • महामार्गावर वेगाचे उल्लंघन केलेल्या 19 हजार 492 वाहनांकडून एक कोटी 
  • जानेवारीत एक हजार 176 वाहनांकडून सुमारे 12 लाख 

अपघात होऊ नयेत, यासाठी महामार्ग पोलिस नेहमी प्रयत्न करतात. मात्र, वेगावर मनाचा ताबा येत नाही. तोपर्यंत वाहनांचाही वेग कमी होणार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे जागृतीच्या पर्यायासह स्वतःची जबाबदारी ओळखून वाहन चालविणेही हेही महत्त्वाचे आहे.'' 
-रघुनाथ कळके, सहायक पोलिस निरीक्षक, महामार्ग पोलिस, कऱ्हाड 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagav DCC Bank Election : जिल्हा सहकारी बँकेच्या 9 जागा बिनविरोध; सर्व बिनविरोधचे प्रयत्न फोल, 7 जागांसाठी रविवारी होणार मतदान

संघाच्या शाखेत अत्याचाराचे आरोप, आत्महत्या प्रकरणावर RSSने दिली प्रतिक्रिया; घटना दुर्दैवी पण...

भारत महान देश, माझा मित्र तिथं टॉपचा नेता; शरीफ यांच्यासमोर ट्रम्पकडून PM मोदींचं कौतुक

Kolhapur ZP Reservation : करवीर, राधानगरी, भुदरगड, पन्हाळ्याचे सभापतिपद खुले; शिरोळ, हातकणंगले अनुसूचित जमातींसाठी राखीव

Weather Update : 'मॉन्सून'बाबत महत्त्वाची अपडेट! महाराष्ट्रातील बहुतांश भागांतून पावसाची माघार; हवामान विभागानं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT