Satara Latest Marathi News 
सातारा

गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच डॉल्बीचा धडाका; खडकवाडीत मालकाविरुद्ध गुन्हा

यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (जि. सातारा) :  राज्यभर डाॅल्बीला बंदी असताना सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात मात्र विनापरवाना डाॅल्बी लावून लग्नाची वरात काढण्यात आली होती. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचा हा मतदारसंघ असून खडकवाडीतील डाॅल्बी मालकाविरुध्द यासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे.

खडकवाडी (ता. पाटण) येथे लग्नाच्या वरातीत विनापरवाना व बेकायदेशीर डॉल्बी लावल्याप्रकरणी लग्न मालक आयोजक व डॉल्बी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. काल रात्री अकराच्या सुमारास खडकवाडी येथे मोठ्या आवाजाने डॉल्बी लावून तरुण मुले वरातीत नाचत असल्याची माहिती मिळाली. 

मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही, तर रक्तपात होईल; उदयनराजेंचा सरकारला कडक इशारा

त्यावरून हवालदार रवींद्र पवार व पोलिस उपनिरीक्षक अनिल पाटील, पोलिस नाईक संदीप पवार, होमगार्ड विजय खडके यांनी घटनास्थळी पाहणी केली. शासनाने दिलेल्या लग्नाच्या परवानगीचे उल्लंघन व डॉल्बी लावून शांतता भंग व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याने संबंधित लग्न मालक सर्जेराव साळुंखे, अंकुश शिंदे (रा. खडकवाडी), अनिल मोरे व सुनील मोरे (रा. भुडकेवाडी), डॉल्बी मालक अमोल जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तारळे दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक अनिल पाटील तपास करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT