Satara Latest Marathi News 
सातारा

Facebook वरील मैत्री महागात; लग्नाच्या आमिषाने सातारच्या महिलेला लाखोंना गंडा; नाशिकातील एकावर गुन्हा

गिरीश चव्हाण

सातारा : फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या ओळखीनंतर रायपूर (ता. चांदवड, जि. नाशिक) येथील जयदीप गणपत खर्डे (वय 35) याने साताऱ्यातील एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवले. लग्नाचे आमिष दाखवत खर्डे याने त्या महिलेकडून सव्वापाच लाख रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलेने याची तक्रार काल रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदवली असून, खर्डे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

गोडोली परिसरात एक 36 वर्षीय महिला राहण्यास आहे. त्या महिलेची फेसबुकच्या माध्यमातून जयदीप गणपत खर्डे (रा. रायपूर) याच्याशी ओळख झाली. ओळखीनंतर जयदीपने त्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवले. आमिष दाखवल्यानंतर ता. 5 जून 2018 ते ता. 16 ऑक्‍टोबर 2019 या काळात जयदीपने वेगवेगळी कारणे सांगत त्या महिलेकडून 5 लाख 19 हजार रुपये उकळले. यानंतर त्या महिलेने जयदीपच्या पाठीमागे लग्नासाठी तगादा लावला. 

मात्र, तो प्रत्येकवेळी वेगवेगळी उत्तरे देत असे. याच काळात जयदीपचे पहिले एक लग्न झाल्याचे त्या महिलेस समजले. जयदीपने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलेने पैशाची मागणी त्याच्याकडे केली. मात्र, जयदीपने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे त्या महिलेने जयदीप खर्डे याच्याविरोधात काल रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. याचा तपास सहायक निरीक्षक मोरे करीत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पोलीस संरक्षणात विद्यानंद बापट निवासस्थानी पोहोचले

दुचाकीधारकांना दररोज कमाईची संधी, केंद्रीय मंत्री गडकरींनी दिली मोठी माहिती; ड्रायव्हिंग लायसनबाबतही नवा नियम

तब्बल ९२ किलोची होती जान्हवी किल्लेकर; प्रेग्नन्सीनंतर घटवले ४३ किलो पण कसे? म्हणाली, 'मी धावायला जायचे पण...

Yuzvendra Chahal ची जादूई डिलिव्हरी अन् बेन स्टोक्स थेट क्लिन-बोल्ड! फिरकीच्या जाळ्यात कसा अडकला, पाहा Viral Video

Umarga News : उमरगा तालुक्यावर शोककळा! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी मोहिते यांनी चिमुकल्यासह संपविले जीवन; एक मुलगा, एक मुलगी दगावली

SCROLL FOR NEXT