Satara Latest Marathi News 
सातारा

फलटणात कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या टेंपोवर पोलिसांचा छापा; 17 लाख मुद्देमालासह 36 जनावरे ताब्यात

किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : शहरातील कुरेशीनगर परिसरात पोलिसांनी कारवाई करत एका टेंपोमधून कत्तलीसाठी आणलेली 36 जनावरे ताब्यात घेतली. या प्रकरणी शहर पोलिसांनी पाच संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला असून, हे संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळाले. या छाप्यात पोलिसांनी 17 लाख रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला आहे. 

याबाबत शहर पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, की ता. 11 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कुरेशीनगर येथे कत्तलीसाठी एका वाहनामध्ये जनावरे डांबल्याची माहिती पोलिस निरीक्षक भारत किंद्रे यांना मिळाली. यानंतर किंद्रे यांनी सहकारी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह कुरेशीनगर येथे छापा टाकला असता त्यांना नगरपालिकेच्या शाळेजवळ दोन टेंपोमध्ये 36 जनावरे आढळली. टेंपोनजीक असणारे हुसेन बालाजी कुरेशी, तय्यब आदम कुरेशी, अल्ताफ जमील कुरेशी, उमर अस्लम कुरेशी (सर्व रा. कुरेशीनगर, मंगळवार पेठ, फलटण) व अल्लाउद्दीन सुलतान सय्यद (रा. फडतरवाडी, ता. फलटण) हे संशयित पोलिस दिसताच अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

पोलिसांनी घटनास्थळी पाच लाख 21 हजार रुपये किमतीची पिकअप गाडी (एमएच 11 टी 5998) व त्यामध्ये 21 जर्सी जातीची वासरे व 11 लाख 80 हजार रुपये किमतीचा टेंपो (एमएच 12 एलटी 7666) व या गाडीमध्ये 10 मोठे रेडे व पाच लहान रेडी त्यासोबत नऊ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 17 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला. याप्रकरणी पाच जणांविरोधात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम व प्राणी छळ अधिनियमानुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन रावळ करीत आहेत.

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT