पोलिस कोठडी esakal
सातारा

गुंड गज्या मारणेच्या टोळीतील 13 संशयितांना पोलिस कोठडी

पुणे- महाबळेश्वर रस्तावरील भीमनगर तिखटण्यात साध्या गणवेशातील कर्मचाऱ्याना नेमून खंडणी वसुलीसाठी तीन चारचाकी गाडीतून आलेल्या 13 जणांना सापळा रचून पकडले हाेते.

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : येथील एका बांधकाम व्यावसायिकाला धमकी देऊन खंडणीची मागणी करण्यासाठी आलेल्या पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणेच्या टोळीतील 13 संशयितांना पोलिसांनी नुकतीच अटक केली. या सर्वांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली.

वाघू तुकाराम हळंदे (वय 41, रा. जकातनाका वारजे, पुणे), गोरखनाथ माणिक शिळीमकर (वय 37), अमोल बंडू शिळीमकर (वय 33), विशाल चंद्रकांत शेळके (वय 23), सौरभ तानाजी शिळीमकर (वय 22), सचिन अंकुश शिळीमकर (वय 35 सर्व रा. तांबड, ता. भोर, जि. पुणे), बालाजी कमलाकर कदम (वय 28 रा. दत्तवाडी, सिंहगडरोड, पुणे), मंदार सुरेश बांदल (वय 33), राहुल रामकृष्ण कळवणकर (वय 26), रोहन रमाकांत वाघ (वय26, रा. विंग, ता. खंडाळा, जि. सातारा), तुषार बाळासाहेब बदे (वय 30), आनंद तुळशीदास यादव (वय 35), विक्रम विलास समुद्रे (वय 30, रा. दत्तवाडी, पुणे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत फिर्याद प्रवीण दिनकर शिंदे (रा. सोनगीरवाडी, वाई) यांनी पोलिस ठाण्यात दिली. दीड वर्षापूर्वी साडू लक्ष्मण पार्टे (रा. तायघाट, ता. महाबळेश्वर) यांच्या मालकीची पाचगणी येथील शाळा चालविण्यास दिली होती. त्या वेळी पुण्यातील एकाशी ओळख झाली होती. त्यानंतर त्याने पुण्यातील गुंड गज्या मारणे यांच्यासोबत काम करीत असून, तुला महाबळेश्वर येथे कन्स्ट्रक्‍शन व जमीन खरेदी- विक्रीचे व्यवहार चालू ठेवायचे असतील तर दरमहा 25 लाख रुपये अथवा प्रत्येक व्यवहारामागे पैसे द्यावे लागतील, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. त्या वेळी याकडे दुर्लक्ष केले होते.

पुणे मुंबईकरांनाे! एसटी महामंडळाने घेतला महत्वपुर्ण निर्णय

गुरुवारी (ता. 29) दुपारी पावणेदोनच्या सुमारास काही लोक तुला भेटायला घरी आले होते, त्यांनी तुझा मोबाईल नंबर घेतला आहे, असे वडिलांनी फोन करून सांगितले. त्यानंतर एका अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने 25 लाख रुपये घेऊन भेटायला ये, असे सांगितले; परंतु या लोकांना भेटायला गेल्यावर काही घातपात होऊ शकतो, म्हणून त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार वाईचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पुणे- महाबळेश्वर रस्तावरील भीमनगर तिखटण्यात साध्या गणवेशातील कर्मचाऱ्याना नेमून खंडणी वसुलीसाठी तीन चारचाकी गाडीतून आलेल्या 13 जणांना सापळा रचून पकडले. त्यांनी गुन्हासाठी वापरलेल्या 19 लाखांच्या तीन चारचाकी गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून वाई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक संजय मोतेकर करीत आहेत. या गुन्ह्यातील 13 संशयितांना आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्यांना ता. 3 मे पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

आयुष्यभर शेतीत काबाड कष्ट करून शरीराबरोबर मनानंही कणखर साथ दिली आणि मी पुन्हा..

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT