arrest team esakal
सातारा

पुरंदर तालुक्‍यातील पोमणनगरच्या युवकाचा खून; गुंड अटकेत

गिरीश चव्हाण

सातारा : कारागृहातील वादाच्‍या रागातून पुरंदर (purandar) तालुक्‍यातील पोमणनगरमधील (पिंपळे) मंगेश सुरेंद्र पोमण (वय ३५) याचा खून करत मृतदेह वाठार बुद्रुक येथील कालव्‍यात फेकण्‍यात आला होता. याप्रकरणी लोणंद पोलिसांनी (lonand police) वैभव सुभाष जगताप (वय २८, रा. पांगारे, ता. पुरंदर, जि. पुणे) या सराईत गुन्‍हेगाराला अटक (arrest) केली आहे. अटकेतील जगताप याचा साथीदार फरारी असून, त्‍याचा शोध सुरू असल्‍याची माहिती अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. (satara-crime-news-lonand-police-arrested-criminal-from-purandar-pune)

अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक धीरज पाटील म्हणाले वाठार बुद्रुक (ता. खंडाळा) येथील नीरा उजवा कालव्‍यात ता. ८ रोजी विवस्‍त्रावस्‍थेतील युवकाचा मृतदेह सापडला होता. त्‍या युवकाचा गळा दाबून खून केल्‍याचे शवविच्‍छेदनानंतर समोर आले होते. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्‍या सूचनेनुसार लोणंदचे सहा‍यक निरीक्षक विशाल वायकर करत होते. यासाठी वायकर यांनी उपनिरीक्षक गणेश माने, सहायक फौजदार शौकल सिकिलकर, देवेंद्र पाडवी, कर्मचारी महेश सपकाळ, अंकुश इवरे, अविनाश नलवडे, संतोष नाळे, ज्ञानेश्‍वर मुळीक, श्रीनाथ कदम, अभिजित घनवट, सागर धेंडे, अविनाश शिंदे, विठ्ठल काळे, फैयाज शेख, अमोल पवार, शशिकांत गार्डी, गोविंद आंधळे, केतन लाळगे, प्रिया दुरगुडे, मल्‍हारी भिसे यांची पथके केली होती.

तपासादरम्‍यान तो मृतदेह पोमणनगर येथील मंगेश पोमण याचा असल्‍याचे समोर आले. बाललैंगिक अत्‍याचार कायद्यानुसार येरवडा कारागृहात शिक्षा भोगणारा पोमण हा काही दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आल्‍याचे पोलिसांना समजले. यानुसार पोलिसांनी केलेल्‍या तपासादरम्‍यान येरवडा कारागृहात असताना पोमण याची खून व इतर गंभीर गुन्ह्यात शिक्षा भो‍गणाऱ्या वैभव सुभाष जगताप आणि ऋषिकेश दत्तात्रय पायगुडे (रा. कुडजे, ता. हवेली, जि. पुणे) यांच्‍याशी वाद झाल्‍याचे समजले, तसेच जगताप आणि पायगुडे हेदेखील कारागृहातून जामिनावर बाहेर असल्‍याचे समजले.

यानुसार पोलिसांनी पांगारे येथे जाऊन जगताप याला ताब्‍यात घेतले. चौकशीत जगतापने कारागृहात झालेल्‍या वादाच्‍या रागातून मंगेश पोमण याचा पायगुडेच्‍या मदतीने गळा दाबून खून करत मृतदेह वाठार बुद्रुक येथे टाकल्‍याची कबुली दिली. यानुसार जगतापला अटक करण्‍यात आली असून, त्‍याचा साथीदार पायगुडे हा फरारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT