Dahiwadi Police Murder Case esakal
सातारा

माण तालुका हादरला! शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याचा निर्घृण खून; डोके, मान, गळ्यावर धारदार शस्त्राने वार

सकाळी शेतकरी शेतात जात असताना रक्ताळलेल्या अवस्थेत पडलेले मृतदेह आढळून आले.

रुपेश कदम

या घटनेबाबत दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा सुरु असून लवकरच आरोपी हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दहिवडी : संजय रामचंद्र पवार (वय ४९ वर्षे) व मनिषा संजय पवार (वय ४५ वर्षे) या दाम्पत्याचा अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची भयंकर घटना आंधळी (ता. माण) येथे घडली आहे.

संजय व मनिषा हे दाम्पत्य येथील पवार दरा येथे शेतात पिकाला पाणी देण्यासाठी शनिवारी रात्री दहानंतर विद्युत पंप सुरु करण्यास आले होते. रात्री साधारण दहा ते अकराच्या दरम्यान अज्ञाताने धारदार शस्त्राने डोक्यावर, मानेवर, गळ्यावर वार करून या दाम्पत्याची निर्घृण हत्या केली.

सकाळी या परिसरातील शेतकरी शेतात जात असताना रक्ताळलेल्या अवस्थेत पडलेले मृतदेह आढळून आले. त्यानंतर सदरची माहिती पोलिस पाटील यांना देण्यात आली. पोलिस पाटीलांनी ही माहिती दहिवडी पोलिस (Dahiwadi Police) ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना दिल्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेबाबत दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा सुरु असून लवकरच आरोपी हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT